जॉब वार्ता : इंडियन बँकेत निघाली तब्बल १५०० पदांवर भरती; त्वरा करा

इंडियन बँकेत एकूण १५०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. जाणून घ्या काय आहेत अटी आणि निकष

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th July, 11:20 am
जॉब वार्ता : इंडियन बँकेत निघाली तब्बल १५०० पदांवर भरती; त्वरा करा

पणजी :   बँकेत नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. बहरतीय बँकिंग क्षेत्रातील अग्रणी इंडियन बँकेने शिकाऊ उमेदवारांसाठी नवीन अर्ज मागिवले आहेत. या भरतीअंतर्गत एकूण १५०० जागा भरल्या जाणार आहेत. तरुण उमेदवारांना बँकिंग क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव मिळविण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा भरती मोहिमेचा उद्देश आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊयात.Indian Bank Apprentice Recruitment 2024 Out, Apply Online Starts for 1500  Vacancies

काल १० जुलै रोजी इंडियन बँकने त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.indianbank.in वर १५०० शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. दरम्यान, ३१ जुलै २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इंडियन बँकेची ही भरती मोहीम तरुण पदवीधरांना बँकिंग क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव मिळविण्याची महत्त्वपूर्ण संधी प्रदान करते Indian Bank Current Account

.. काही महत्वपूर्ण अटी व निकष 

या भरतीसाठी उमेदवारांचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे. मात्र एससी/एसटी/ओबीसी/पीडब्लूबीडी श्रेणीतील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांनी ३१.०३.२०२० नंतर त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.Indian banks shine amid robust economic growth : The Tribune India

.. अशी असेल निवड प्रक्रिया

सर्वात प्रथम उमेदवारांची ऑनलाइन लेखी परीक्षा होईल. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. पुढे उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जाईल. हे तीन टप्पे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची इंडियन बँकेत शिकाऊ म्हणून निवड केली जाईल.Indian Bank Bharti: इंडियन बैंक में बिना परीक्षा ऑफिसर बनने का गोल्डन चांस,  चाहिए ये योग्यता, 89000 है सैलरी - indian bank recruitment 2024 sarkari  naukri 2024 so officer job bharti in

.. असा करावा अर्ज 

- सर्वप्रथम इच्छुक व पात्र उमेदवारांनी इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट indianbank.in वर भेट द्यावी.

- पुढे लॉगिन सेक्शनच्या खाली दिलेल्या 'रजिस्ट्रेशन' लिंकवर क्लिक करावे.

- रजिस्टर केल्यानंतर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करावी.

- अर्जात दिलेल्या कागदपत्रे अपलोड करावीत .

- अर्ज शुल्क भरावा. 

- अर्जाची प्रिंटआऊट काढून घ्यावी.