विद्यार्थ्यांनी दहावीनंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करावी : मुख्यमंत्री

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th July, 12:05 am
विद्यार्थ्यांनी दहावीनंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करावी : मुख्यमंत्री

पणजी : राज्यातील विद्यार्थ्यांनी दहावीनंतर राज्यसेवा किंवा लोकसेवा आयोग अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करावी असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. शनिवारी त्यांनी श्रीमती हायस्कूल, वेळगे येथून आभासी पद्धतीने राज्यभरातील ८वी ते १०वी इयत्तेच्या ६० हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात डॉ. महादेव गावस यांनी करिअर मार्गदर्शन केले. तर पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सायबर गुन्ह्यांची माहिती दिली.

गोव्यात अन्य राज्यांप्रमाणे स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक अशी संस्कृती तयार झाली पाहिजे. यासाठी उच्च शिक्षण स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. स्पर्धा परीक्षा हा विद्यार्थ्यांसाठी एक चांगला करीयर पर्याय ठरू शकतो. यासाठी दहावी नंतरच तयारी सुरू करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. 


राज्यातील १२ आयटीआय मध्ये १४ ते १५ प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. यांचा विविध कोशल्यविकासासाठी फायदा होऊ शकतो. काही विद्यार्थ्यांनी आयटीआय केल्यानंतर यशस्वी उद्योजक बनले आहेत. त्यामुळे आयटीआयला कमी दर्जाचे समजू नये, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

मी स्पर्धा परीक्षा देताना मोबाईल केवळ ठरावीक काळासाठी वापरत होतो. तुम्हालादेखील स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर मोबाईलचा कमीतकमी वापर करावा लागेल, गुप्ता म्हणाले.

हेही वाचा