कारवारला पावसाने झोडपले; जनजीवन विस्कळीत

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
04th July, 05:42 pm
कारवारला पावसाने झोडपले; जनजीवन विस्कळीत

कारवार : गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्र-गोवा आणि कर्नाटकाच्या किनारी भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. कारवार जिल्ह्यातील किनारी भागातील तालुक्यांना पावसाने झोडपून काढल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.  कारवार-शिवमोग्गा-बेंगळूरू महामार्ग आणि कुमठा -सिरसी राज्य मार्गांवर पाणी आल्याने दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

बुधवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे येथील नदी नाले यंदा प्रथमच ओसंडून वाहत आहेत. होन्नावर तालुक्यातील चिकनकोड येथील स्थानिकांच्या  घरात पाणी शिरल्याने अनेक कुटुंबियांना तेथून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, होन्नावर तालुक्यातील अनेक गावांत पाणी शिरल्याने तेथील १० शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आहे. मुगवा -वर्णकेर रस्त्यावर दरड कोसल्याने तेथील वाहतूक ठप्प झाली आहे. 

याचप्रमाणे कारवार -शिवमोग्गा - बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गांवर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. कुमठा -सिरसीला जोडणाऱ्या राज्य मार्गावर असलेल्या नदीला पूर आल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले असून हा मार्गही वाहतूकसाठी बंद झाला आहे. गोकर्ण, भटकळ येथेही रस्ते पाण्याखाली गेल्याने रहदारी  खोळंबून गेली आहे.  Rain batters Karnataka coast, Karwar most affected | Mangaluru News - Times  of India

कारवार तालुक्यातील कद्रा धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण अनेक पटींने वाढल्याने या धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली असून, त्यामुळे धरणालगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. Goan Varta: कारवार, उडुपी, दक्षिण कन्नडला पावसाने झोडपले

हेही वाचा