अदानी समूहाविरुद्ध खोटा अहवाल,हिंडेनबर्गने किंगडनसोबत रचला कट-सेबीचा अहवाल

भारतीय शेयर बाजार नियामक सेबीने यूएसमधील शॉर्टसेलर्सना कारणे दाखवा नोटिस बजावली. यातून आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. हिंडेनबर्ग रिसर्च, विदेशी गुंतवणूकदार मार्क किंगडन आणि त्यांच्या इतर संस्थांनी अदानी एंटरप्रायझेसच्या फ्युचर्सच्या शॉर्ट सेलिंगद्वारे प्रचंड नफा कमावला आहे. यामुळे हिंडेनबर्ग रिसर्चच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th July, 10:59 am
अदानी समूहाविरुद्ध खोटा अहवाल,हिंडेनबर्गने किंगडनसोबत रचला कट-सेबीचा अहवाल

नवी दिल्ली : जानेवारी २०२३ मध्ये अदानी समूहाविरुद्ध चुकीचा अहवाल प्रसिद्ध करत अदानी व पर्यायाने भारतीय शेअर मार्केटला नुकसान पोहचवणाऱ्या अमेरिकन शॉर्टसेलर मार्क किंगडन व हिंडेनबर्ग रिसर्चचे कटकारस्थान उघड झाले आहे. बाजार नियामक  सेबीने हिंडेनबर्ग रिसर्चला पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसीच्या उत्तरात अनेक धक्कादायक बाबी स्पष्ट झाल्याFeatures of the Security and Exchange Board of India (SEBI)

. हिंडनबर्ग रिसर्च, विदेशी गुंतवणूकदार मार्क किंगडन आणि त्यांच्या संस्थांनी अदानी एंटरप्रायझेसच्या फ्युचर्सच्या शॉर्ट सेलिंगद्वारे प्रचंड नफा कमावला आहे. कोटक महिंद्रा बँकेचाचा वापर अदानीला शॉर्ट-सेल करण्यासाठी कथितपणे केल्याचेही उघड झाले आहे. यामुळे कोटक् महिंद्रा बँक देखील सेबीच्या निशाण्यावर आली आहे. SEBI issues show-cause notice to Hindenburg, Nathan Anderson over Adani  report - The Financial World

या खुलाशानंतर, कोटक बँकेनेही आपल्या स्पष्टीकरणात सांगितले की, हिंडनबर्ग कधीही कोटक महिंद्रा इंटरनॅशनलचे ग्राहक नव्हते किंवा त्यांच्यामार्फत कधीही इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडमध्ये गुंतवणूक केली गेली नाही. तसेच हिंडेनबर्ग हा त्याच्या कोणत्याही गुंतवणूकदाराचा भागीदार आहेत का याची देखील कल्पना नाही.SEBI Investigation into Hindenburg Research and Adani Group: The Kotak  Connection - Global Governance News- Asia's First Bilingual News portal for  Global News and Updates

सेबीच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मार्क किंगडनच्या K-India Opportunities Fund – Class F ने एक ट्रेडिंग खाते उघडले आणि हिंडनबर्गचा अहवाल प्रकाशित होण्यापूर्वी एक महिन्याआधी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग सुरू केले. यासाठी कोटक महिंद्रा बँकेने ऑफशोअर फंडाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. The Adani-Hindenburg Saga

अदानीविरोधातील हिंडेनबर्ग अहवालात चीनचाही सहभाग आढळून आला आहे. यामध्ये किंगडन कॅपिटल आणि चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या एजंट्सच्या 'द चायना प्रोजेक्ट'चा संबंध समोर येत आहेत. 'द चायना प्रोजेक्ट'च्या मालक, ॲनाला चेंग असून त्या  मार्क किंगडन यांच्या पत्नी आहेत. या दोघांचा चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या एजंटांशी संबंध असल्याचा संशय असून सीआयए व अमेरिकन सिनेटकडून या प्रकरणी चौकशी केली जात आहे.Adani-Hindenburg: Now For Those Money Laundering Allegations - Bloomberg

मार्क किंगडन हे किंगडन कॅपिटलचे संस्थापक आणि मालक आहेत. ते अमेरिकेतील एक प्रमुख गुंतवणूकदार आहेत. याप्रकरणात  किंगडनच्या सहभागामुळे अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यासोबतच हे किंगडन-चॅन  दाम्पत्य  सिनो-सेंच्युरी या प्रायव्हेट इक्विटी फर्ममध्ये शेअरिंग पार्टनरदेखील  आहेत. याशिवाय ॲनाला चेंग न्यूयॉर्कस्थित वृत्तसंस्था SupChina च्या संस्थापक आहेत.Adani-Hindenburg Saga: Mark Elliot Kingdon's Role Revealed

सुप्रसिद्ध कॉर्पोरेट वकील महेश जेठमलानी यांनी या प्रकरणाबाबत माहिती देतांना म्हटले की हिंडेनबर्ग अहवाल प्रकाशित होण्यापूर्वी, किंगडन इंडिया अपॉर्च्युनिटी फंडने मॉरिशस मार्गाने अदानी शेअर्समध्ये मोठी शॉर्ट पोझिशन घेतली होती. त्यांनी हे देखील उघड केले की किंगडन कुटुंबाच्या मालकीच्या किंगडन मास्टर फंडाद्वारे तब्बल ४० दशलक्षची डॉलर्सची रक्कम याकामी प्रदान करण्यात आली होती.Forbes on LinkedIn: Billionaire Gautam Adani's Wealth Jumps After India's  Supreme Court Says…

या एकूण प्रकरणाचे मूळ हे हैफा बंदराचा करार आहे. हैफा बंदर इस्रायलमध्ये आहे. हैफा बंदराची कमान अदानी समूहाकडे आहे. या बंदराच्या अधिग्रहणादरम्यान, अदानी पोर्ट्स आणि इस्रायलच्या गॅडोटने चिनी कंपन्यांना मागे टाकले होते. अदानी समूहाने या बंदराचा ताबा घेणे हा भारताचा मोठा विजय होता. हैफा हे इस्रायलच्या सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. महत्त्वाचे म्हणजे या लिलावात मागे पडलेल्याइतर २ चीनी कंपन्यांत 'द चायना प्रोजेक्ट' या कंपनीचाही समावेश होता. याचाच अर्थ हिंडेनबर्गने किंगडनसोबत मिळून अदानी समूहाविरुद्ध चुकीचा अहवाल प्रसिद्ध करून समूहाच्या प्रतिष्ठेला हानी पोहचवली अशी माहिती सेबीच्या खुलाशातून उघड झाली आहे. Haifa Port Co. Logs Record Year

हेही वाचा