मध्यपूर्व आशिया : ज्याला बनवणार होते हिजबुल्लाहचा म्होरक्या; तो नसराल्लाहचा भाऊ बेरूतमध्ये ठार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th October, 10:10 am
मध्यपूर्व आशिया : ज्याला बनवणार होते हिजबुल्लाहचा म्होरक्या; तो नसराल्लाहचा भाऊ बेरूतमध्ये ठार

बेरूत :  इस्रायलच्या आयडीएफने काही दिवसांपूर्वी बंकरवर हल्ला करत हिजबुल्लाहचा म्होरक्या नसराल्लाह याला ठार केले. याचदरम्यान त्यांची मुलगी झैनब देखील ठार झाली. दोनच दिवसांपूर्वी त्याचा जावई देखील एका भीषण हल्ल्यात ठार झाला. इस्रायली लष्कराने गुरुवारी बेरूतमधील एका भागाला लक्ष्य केले. आयडीएफच्या विमानांनी एका भूमिगत बंकरवर बॉम्बचा वर्षाव केला. याच बंकरमध्ये हिजबुल्लाहचे उच्च अधिकारी येथे बैठक घेत होते. हल्ल्यात  हिजबुल्लाहचे अनेक टॉप कमांडर ठार झाले व यात नसराल्लाहचा भाऊ  हाशिम सफीद्दीन याचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे

हिजबुल्लाहची सर्वोच्च सल्लागार संस्था असलेल्या शूरा कौन्सिलवर काम करणाऱ्या सहा मौलवींपैकी सैफिद्दीन हा एक आहे. 2001 मध्ये त्यांची कार्यकारी परिषदेच्या प्रमुखपदी निवड झाली.

 अद्याप आयडीएफ किंवा हिजबुल्लाह या दोघांनीही सफीद्दीनच्या हत्येबाबत कोणतेही विधान जारी केलेले नाही. नसराल्लाह गेल्या आठवड्यात मारला गेल्यानंतर, सफीद्दीनला त्याचा उत्तराधिकारी मानले जात होते. तो नसराल्लाहचा चुलत भाऊ आहे. सफीद्दीन स्वत:ला प्रेषित मोहम्मदचा वंशज मानतो. २०१७  मध्ये अमेरिकेने त्याला दहशतवादी घोषित केले. तो हिजबुल्लाहच्या राजकीय घडामोडींचे व्यवस्थापन पाहत होता. याशिवाय संघटनेच्या लष्करी कारवायांची आखणी करणाऱ्या जिहाद कौन्सिलचाही तो अध्यक्ष होता. 

सैफिदीनचा हा फोटो २४ मे मधला आहे. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या निधनानंतर एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.

इस्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र युनिटच्या प्रमुखाची हत्या केली

हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र उत्पादन युनिटचा मुख्य तज्ञ महमूद युसेफ अनिसी याला ठार केल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. आयडीएफने गुप्तचर माहितीच्या आधारे बेरूतमध्ये ही कारवाई केली. इस्रायली लष्कराच्या माहितीनुसार तो १५ वर्षांपासून हिजबुल्लाहशी संलग्न होता.

महमूद युसूफ अनिसी हे हिजबुल्लाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठे नाव होते.

गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात एका दिवसात ९९  लोकांचा मृत्यू झाला

दरम्यान गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, गुरुवारी इस्रायली हल्ल्यात ९९ लोकांचा मृत्यू झाला. तर १६९ जण जखमी झाले आहेत. गेल्या ७ ऑक्टोबरपासून गाझामधील एकूण मृतांची संख्या ४१,७८८ वर पोहोचली आहे.

इस्रायलने हिजबुल्लाहविरोधातील हल्ल्याचा व्हिडिओही जारी केला आहे.

लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात ३७  जण ठार झाले

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सायंकाळी जारी केलेल्या रिपोर्टनुसार, गेल्या २४ तासांत इस्रायली हल्ल्यात ३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, १५१ जखमी झाले आहेत. लेबनॉनमध्ये बुधवारी ४६, मंगळवारी ५५, सोमवारी ९५ आणि रविवारी १०५ जणांचा मृत्यू झाला.


इस्त्रायली सैन्याने गुरुवारी बेरूतच्या उत्तर भागात अनेक हल्ले केले.


हेही वाचा