दिल्ली : ॲमेझॉनच्या नावे ग्राहकांची अनोखी फसवणूक; ऑर्डर न करताच येते पार्सल

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म ॲमेझॉनच्या नावे सध्या फसवणूक होत आहे. ग्राहकांनी ऑर्डर न करता पार्सल ग्राहकांच्या घरी पोहोचत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ऑर्डर्स कॅश ऑन डिलिव्हरी असतात. डिलिव्हरी बॉय पार्सल परत न घेत नाही आणि त्यामुळे ग्राहकाला त्यांचे पैसे भरावेच लागतात.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd October, 11:23 am
दिल्ली : ॲमेझॉनच्या नावे ग्राहकांची अनोखी फसवणूक; ऑर्डर न करताच येते पार्सल

नोएडा : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म ॲमेझॉनच्या नावावर फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. ग्राहकांनी ऑर्डर न केलेल्या पार्सलसह डिलिव्हरी बॉय ग्राहकांच्या घरी पोहोचत आहेत. जेव्हा हे डिलिव्हरी बॉय लोकांच्या घरी पोहोचतात तेव्हा ते म्हणतात की तुमच्यासाठी कोणीतरी ऑर्डर केली आहे पण तुम्हाला पैसे द्यावे लागतील कारण ती कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर आहे. अशा वेळी घरी उपस्थित असलेल्या लोकांना माहिती नसेल, तर ओळखीच्या व्यक्तीने ऑर्डर दिली असावी, असा विचार करून ते पेमेंट करतात. पण हे पार्सल उघडल्यावर त्यात निकृष्ट दर्जाची वस्तु सापडली. 

Amazon- India TV Hindi

नोएडाच्या सेक्टर ८२ मधील उद्योग विहार सोसायटीचे प्रकरण

अशीच एक घटना  नोएडाच्या सेक्टर ८२ मध्ये असलेल्या उद्योग विहार (LIG) सोसायटीत घडली आहे. एक डिलिव्हरी बॉय ३० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३.१० च्या सुमारास येथील फ्लॅटवर पोहोचला. या डिलिव्हरी बॉयने फ्लॅटमध्ये उपस्थित महिलांना  ॲमेझॉनवरून एक पार्सल आल्याचे सांगितले. या पार्सलवर फ्लॅटमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता बरोबर लिहिलेला होता. पण पार्सलवर लिहिलेल्या तपशीलात पाठवणाऱ्याच्या नावाव्यतिरिक्त कोणतीही माहिती नव्हती. हे पार्सल कॅश ऑन डिलिव्हरी आहे असे डिलिव्हरी बॉयने सांगितले व पैशांची मागणी करू लागला. 


क्या अमेज़न के ग्राहक रिटर्न फीस को लेकर विद्रोह करेंगे? - रिटेलवायर

फ्लॅटमध्ये उपस्थित महिलांना कुटुंबातील सदस्याने काहीतरी ऑर्डर केले असावे, असे वाटले. त्यामुळे या महिलांनी डिलिव्हरी बॉयला पार्सलचे पैसे देऊन त्याच्याकडून पार्सल घेतले. संध्याकाळी जेव्हा कुटुंबप्रमुख घरी आला तेव्हा घरातील महिलांनी त्याला पार्सलसंदर्भात माहिती दिली. त्याने कोणतीही ऑर्डर दिली नसल्याचे त्याने सांगितले. दरम्यान पार्सल उघडून पाहिल्यास त्यात १०० रुपयांच्या वस्तु आढळून आल्या. या पार्सलसाठी त्यांनी तब्बल ६९९ रुपये मोजले होते. फसवणूक झालेल्या कुटुंबीयांनी ॲमेझॉनच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला असता त्यांना पार्सल पाठवणाऱ्याची माहिती मिळू शकली नाही. 'तुम्हाला या प्रकरणाची माहिती २ दिवसांत मिळेल'  असे तक्रार नोंदवल्यानंतर त्यांनी सांगितले. 


22-year-old engineering student did refund scam of Rs 20 lakh from Amazon,  get to know the full story | 22 साल के इंजीनियरिंग स्‍टूडेंट ने अमेजन को  लगाया लाखों का चूना, ऐसे

या प्रकरणाला २४ तासही उलटले नव्हते, काल १ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा तोच डिलिव्हरी बॉय त्याच फ्लॅटवर संध्याकाळी ५.१५ वाजता पार्सल घेऊन पोहोचला. मात्र १ ऑक्टोबर रोजी फ्लॅटमध्ये उपस्थित कुटुंबप्रमुख घरी उपस्थित असताना त्यांनी डिलिव्हरी बॉयची चौकशी सुरू केली. डिलिव्हरी बॉय घाबरला. तुमचे पार्सल नसेल तर ते रद्द करतो. पण यापुढे तुमचे पार्सल तुम्हाला मिळणार नाही असे थणकाऊं सांगितले. डिलिव्हरी बॉयच्या बोलण्यावर ग्राहकाला शंका आल्याने त्याने डिलिव्हरी बॉयच्या बाईकचा फोटो काढला. मात्र डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीची नंबर प्लेट अर्धी तुटलेली पाहून त्याचा शोध घेणे अशक्यच होते. 


Amazon reports millions in losses due to refund scams - CNBC TV18

सणासुदीचा हंगाम असल्याने अशा प्रकारच्या घटना कोणत्याही व्यक्तीसोबत होऊ शकतात. अशा परिस्थितीत सर्वांनी जागरूक राहण्याची गरज असून अशी कोणतीही घटना समोर आल्यास तत्काळ संबंधित प्लॅटफॉर्मच्या कस्टमर केअरवर  तसेच सायबर पोलिसांत तक्रार नोंदवा.


हेही वाचा