फ्रांस : ७१ वर्षीय महिलेचा 'शोषणाविरुद्धचा लढा' जगासाठी ठरतोय प्रेरक

अनोख्या बलात्कार प्रकरणामुळे गळून पडला पुरुषी सभ्यतेचा मुखवटा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd October, 07:14 pm
फ्रांस : ७१ वर्षीय महिलेचा 'शोषणाविरुद्धचा लढा' जगासाठी ठरतोय प्रेरक

अविग्नोन : काही दिवसांपूर्वी फ्रांसमध्ये धक्कादायक प्रकरण समोर आले. ७१ वर्षीय महिलेवर तिच्याच पतीने पाशवी पद्धतीने बलात्कार केला. इतकेच नाही तर तिला बेशुद्ध करून आपल्या मित्र आणि ओळखीच्या लोकांसमवे मिळून तिचे अक्षरशः लचके तोडले. तिच्यावर तब्बल १०० हून वेळा बलात्कार करण्यात आला. स्वतचाच पती असे काही करेल ही घटना कोणत्याही पत्नीसाठी हेलावून टाकणारी आहे. याही पेक्षा धक्कादायक म्हणजे महिलेच्या पतीने एकंदरीत घटनेचे चित्रीकरण देखील केले. गेली अनेक दशके हा प्रकार सुरू होता. पण, अशा गोष्टी कधीही लपत नाहीत. 

अपनी मां के साथ बलात्कार करने के लिए लोगों को आमंत्रित करने वाले फ्रांसीसी  व्यक्ति की बेटी ने 'नरक में जाने' की बात कही | फ्रांस | द गार्जियन

पोलिसांनी अन्य एका प्रकरणात गिझेल पेलिकॉटचा पती डॉमिनिकची चौकशी सुरू केली आणि आभाळ कोसळले. समोर आलेल्या माहितीनुसार डॉमिनिकने सुपरमार्केटमध्ये शॉपिंग करत असताना स्कर्ट खाली मोबाइल कॅमेरा पकडून फोटो काढल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी डॉमिनिकच्या घरी जात झडती घेतली असता ते एकंदरीत प्रकार पाहून थक्क झाले. पोलिसांना गिझेल सोबत घडलेल्या प्रसंगाचे फोटो व व्हिडिओ मिळाले. पोलिसांनी तिला ते फोटो दाखवत त्याबाबत विचारले असता तिलाही धक्का बसला. पण तीही जास्त काही सांगू शकली नाही. पोलिसांनी या प्रकरणात अधिक खोलवर शिरून तपास करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना अजून थक्क करणारी माहिती मिळाली.  यात त्याच्या मुलींचे व्हीडिओज देखील होते.  अखेर दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी त्या व्हिडओत दिसणाऱ्या प्रत्येकाच्या कॉलरला हात घातला. २०२० साली प्रथम उजेडात आलेल्या या प्रकरणात डॉमिनिक मिळून तब्बल ४८ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले.

सामूहिक बलात्कार के मुकदमे की केंद्र में रही महिला गिसेले पेलिकॉट के समर्थन  में फ्रांसीसी महिलाओं ने रैली निकाली | न्यूज़ टुडे न्यूज़ - द ...

एका वर्षांपूर्वी पार पडलेल्या या प्रकरणातील एका सुनावणीत आरोपींच्या वकिलांनी तिच्याच चारित्र्यावर शिंतोडे उडवत तिलाच बदनाम करण्याचा घाट घातला. पण गिझेल पेलिकॉट बधली नाही. गेल्या वीस दिवसांत तिचा संयम एकदाच ढळला आणि तोही शेवटचाच. दर सुनावणीला न्यायालयांची कारवाई सार्वजनिक केली जाते. यात ६-७ आरोपींना पीजऱ्यात उभे करून गिझेलवरच प्रश्नांची सरबत्ती केली . बऱ्याचदा तिच्या चारित्र्यावर संशय घेत तीच कशी बदफैली आहे हे सिद्ध करण्याचा घाट घातला. 'मी जरी व्हिडिओत बेशुद्ध दिसत असले तरी आता माझ्यासोबत अवघा समाज शुद्धित आला आहे.' असे म्हणत तिने बंद कोर्टात सुनावणी घेण्यास नकार दिला. आरोपींची कृत्ये जगजाहीर व्हावी, तिच्यासारख्याच पाशवी विकृतीला बळी पडलेल्या असंख्य महिलांना बळ मिळावे यासाठी हा खटला सार्वजनिक व्हावा अशी इच्छा  न्यायालयात व्यक्त केली. युरोपसारख्या 'आपण सर्वांपेक्षा प्रगत' असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या खंडात हा प्रकार घडावा हे कोणासही पचनी न पडणारे. 

French women rally to support Gisele Pelicot, woman at the centre of a mass  rape trial - Europe - The Jakarta Post

पण गिझेलच्या या लढ्याने फ्रांसमधील महिलांना बळ मिळाले. त्यांनीही त्याचे संघर्ष जगासमोर मांडले. गिझेलला 'मॉडर्न जोएन ऑफ आर्क' म्हटले जात आहे. त्यास कारणही तसेच आहे. जवळपास ६०० वर्षांपूर्वी फ्रांसमध्येच जोन ऑफ आर्कने पुरुष प्रधान सभ्यतेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण तिला चेटकीण-पिशाच्च-भानामती म्हणत जीवंत जाळण्यात आले. त्याच आगीत गिझेल पेलिकॉट तावून-सुलाखून निघाली आणि जगासमोर तिने नवा आदर्श ठेवला. The 12 Most Intriguing Stories Surrounding Joan Of Arc

इतके सहन करूनही ताठ मानेने न्यायालयात हजर राहणारी ही महिला अवघ्या समाजासाठी प्रेरणास्थान ठरली आहे. पुरुषी वर्चस्वास पार धुळीस मिळवून त्यावर स्त्रीहक्कांचा झेंडा रोवणारी म्हणून राष्ट्रीय नायिका ठरली आहे. तिच्यावर बलात्कार करणारे ट्रक ड्रायव्हर, शिक्षक, वकील, व्यापारी, कामगार, पत्रकार यासह समाजातील इतर घटकही आहेत. मात्र आता आरोपींच्या खोट्या सभ्यतेचा मुखवटा गळून पडला असून शरमेने तोंड लपवण्याची पाळी आता त्यांच्यावर आली आहे.   

True Crime Society - 'Without her Knowing' – the Gisele Pelicot story

दरम्यान याप्रकरणातील मुख्य आरोपी डॉमिनिक याने त्याच्यावर असलेल्या सर्व आरोपांची कबुली दिली. त्यावेळी त्याने गिझेलकडे पाहत माफीची याचना केली. याशिवाय सुमारे दोन डझन आरोपींनी देखील आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. दरम्यान न्यायालयाने या खटल्याकडे दुर्मिळातील दुर्मिळ खटला म्हणून पाहत असल्याचे म्हटले आहे. उच्च पराकोटीची विकृती, एकूणच प्रकरणाचा भयावह इतिहास आणि स्त्रीत्त्वाचे खच्चीकरण या दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहिले जात आहे.    

Son état de santé s'est aggravé » : Dominique Pelicot absent au procès des  viols de Mazan au moins jusqu'à lundi - Le Parisien

अभियोग पक्षाने सर्व फोटो न्यायालयात उघड केले. त्यातील चित्रे पाहून न्यायालयात हजर सर्वांची नजर जमिनीला खिळली. अवघ्या २० फोटो / व्हिडीओंद्वारे हे प्रकरण किती विभत्स आहे यांची कल्पना समाजाला आली. कायद्यानुसार फ्रांस किंवा युरोपियन युनियनमधील कोणताही खटला हा ज्यूरी नेमून चालवला जातो. गंभीर प्रकरणांत ज्यूरीविना खटला चालवण्याची तरतूद २०१६ साली करण्यात आली. पुढील २-३ महिन्यांत या खटल्याचा निकाल लागेल. गुन्हे सिद्ध झाल्यास आरोपींना किमान २० वर्षांपर्यंतची शिक्षाही होईल. पण या प्रकरणाने एक गोष्ट मात्र सिद्ध केली आहे. समाजाने आपण कितीही सुसंस्कृत असल्याची स्वतची भलावण केली तरीही या खोट्या सभ्यतेच्या मुखवट्याखाली लपलेला पाशवी पुरुषी चेहरा जगासमोर उघडा पाडण्यासाठी जोएन ऑफ आर्क जन्म घेतेच. 

L'histoire secrète de la statue de Jeanne d'Arc | Un jour de plus à Paris


हेही वाचा