अर्थकारण : वेगाने वाढतोय भारताच्या आर्थिक विकासाचा आलेख

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd October, 02:05 pm
अर्थकारण : वेगाने वाढतोय भारताच्या आर्थिक विकासाचा आलेख

मुंबई : आज जगातील अनेक विकसित आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक समस्यांना तोंड देत असताना, जागतिक स्तरावर अनेक प्रतिकूल परिस्थिती असतानाही, भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. अनेक विदेशी आणि गुंतवणूक कंपन्या भारताच्या जीडीपी वाढीसाठी त्यांचे अंदाज नव्याने बांधत आहेत.


Indian economy likely gained pace in March qtr, data to be released today |  Economy & Policy News - Business Standard

विशेषत: कोरोना महामारीनंतर भारताने आर्थिक विकासाच्या क्षेत्रात झपाट्याने वेग पकडला आहे. भारतात आर्थिक क्षेत्रात सुधारणा कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. प्रख्यात क्रेडिट रेटिंग एजन्सी स्टँडर्ड अँड पुअर्स (S&P) ने अलीकडेच एका अहवालात म्हटल्यानुसार, २०२४ आणि त्यापुढील कॅलेंडर वर्षात ६.७ टक्के आर्थिक विकास दरासह भारत २०३१ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि भारतीयांचे जागतिक अर्थव्यवस्थेतील योगदानही  सध्याच्या ३.६ टक्क्यांवरून वरून ४.६ टक्क्यांपर्यंत वाढेल. या सोबतच भारतातील दरडोई उत्पन्नही उच्च मध्यम उत्पन्न गटापर्यंत वाढेल.

India must grow at 8% to bring transformational changes for people: Summers  | Economy & Policy Analysis - Business Standard

भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा आकारही सध्याच्या ३.९२ लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवरून ७ लाख कोटी अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढेल. तथापि, S&P चा अंदाज आहे की भारताचा आर्थिक विकास आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ६.७ टक्के वार्षिक दराने वाढेल. भारत आता सरकारी क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्र देखील भांडवली खर्च वाढवण्यावर भर देताना दिसत आहे. यामुळे भविष्यात भांडवली खर्च वाढवण्यासाठी केंद्र सरकारवरील दबाव कमी होईल आणि  अर्थसंकल्पीय तूट अधिक वेगाने कमी होईल, यामुळे परकीय गुंतवणूकदार भारतातील त्यांची गुंतवणूक वाढवण्यासाठी आकर्षित होतील.

How sweet is India's spot? | Expert Views - Business Standard

त्याचप्रमाणे, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देखील २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये भारताच्या आर्थिक वाढीसाठी त्यांचे अंदाज वाढवले ​​आहेत. जागतिक बँकेने वर्तवलेल्या एका अंदाजानुसार कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये भारताने जगाच्या आर्थिक विकासात १६ टक्के योगदान दिले आहे आणि त्यामुळे भारत आता जगात आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून पाहिले जात आहे.

What is in store for Indian economy? Take a sneak peek here | Zee Business

एकंदरीत समोर आलेल्या माहितीनुसार, भारताने २०२३ मध्ये ७.२ टक्के आर्थिक विकास दर गाठला होता. जो याच कालावधीत जगातील इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी साधलेल्या विकास दरापेक्षा दुप्पट होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा आर्थिक विकास दर २०२४ च्या ६.७ टक्क्यांवरून ७.३ टक्के केला आहे. OECD देशांच्या गटाने २०२४ आणि २०२५ मधील जागतिक आर्थिक प्रगतीचे अंदाजही जारी करण्यात आले आहेत. या अंदाजानुसार, २०२४ आणि २०२५ मध्ये जागतिक पातळीवर सकल देशांतर्गत उत्पादनात ३.२ टक्के वाढ होईल.

हेही वाचा