मध्यपूर्व आशिया : एकेकाळी इराणने वठवली इस्रायलच्या निर्मितीत महत्वाची भूमिका; आज उठलाय जिवावर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd October, 12:12 pm
मध्यपूर्व आशिया : एकेकाळी इराणने वठवली इस्रायलच्या निर्मितीत महत्वाची भूमिका; आज उठलाय जिवावर

तेल अविव : इतिहासात डोकावून पाहताना अनेक रंजक घटना आपल्या दृष्टीस पडतात. आज एकमेकांच्या जिवावर उठलेले इस्रायल आणि इराण कोण्या एकेकाळी घनिष्ट मित्र होते हे कुणासही पटणार नाही. पण हे सत्य आहे. ७०-८० च्या दशकात इस्लामिक क्रांतीपूर्वी इराणवर पहलवी राजघराण्याचे राज्य होते. तेव्हा इराणचे इस्रायलशी संबंध खूपच मैत्रीपूर्ण होते. त्यावेळी इराण हा मध्यपूर्वेतील अमेरिकेचा प्रमुख मित्र देशही होता. १९४८ मध्ये जेव्हा इस्रायलची स्थापना झाली तेव्हा तुर्कीनंतर इराण हा इस्रायलला मान्यता देणारा दुसरा मुस्लिम देश होता.

Israel and Iran's deadly game - New Statesman

इस्रायलचे संस्थापक आणि पहिल्या सरकारचे प्रमुख डेव्हिड बेन गुरियन यांनी आपल्या अरब शेजाऱ्यांना शांत करण्यासाठी इराणशी मैत्री केली होती. पण, १९७९मध्ये कट्टर अयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या क्रांतीने पहलवी राजघराण्याच्या यबिन शाह यांची सत्ता उलथवून इस्लामिक प्रजासत्ताक राज्य लादले. खोमेनी यांनी स्वतःला इराणचा प्रमुख घोषित केले होते. 

Ali Khamenei - Wikipedia

अयातुल्लाच्या सरकारने इस्रायलशी संबंध तोडले. तेहरानमधील इस्रायली दूतावास ताब्यात घेत पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (पीएलओ) च्या ताब्यात दिले. त्या वेळी पीएलओ स्वतंत्र पॅलेस्टाईनसाठी इस्रायलविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व करत होते. तरीही इस्रायल आणि इराणमधील ही मैत्री इतकी घट्ट होती की, खामेनी आल्यानंतरही १९८० ते १९८८ या काळात इराण-इराक युद्धात इस्रायलने इराणला बरीच मदत केली.  २२ सप्टेंबर १९८० रोजी सद्दाम हुसेनच्या सैन्याने इराणवर अचानक हल्ला केला. युद्धादरम्यान इराणला लष्करी साहित्य पुरवण्यात इस्रायल आघाडीवर होता. त्यावेळी इस्रायलने इराकच्या ओसिराक अणुभट्टीवर बॉम्ब घालत ऑपरेशन बॅबिलोन अंतर्गत ती पूर्णपणे नष्ट केले. ही अणुभट्टी इराकच्या अण्वस्त्र कार्यक्रमाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. त्यावेळी इराकमध्ये हुकूमशहा सद्दाम हुसेनचे राज्य होते.

Saddam Hussein - Death, Policies & Family

इस्रायलने लेबनॉनवर १९८२ मध्येआक्रमण केले आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनची हकालपट्टी केली. दक्षिण लेबनॉनमधील सुरक्षा क्षेत्राच्या आगामी निर्मितीमुळे इस्रायली सहयोगी आणि लेबनॉनमधील नागरी इस्रायली लोकसंख्येचा तात्पुरता फायदा झाला. याचा परिणाम म्हणजे दक्षिण लेबनॉनमध्ये पॅलेस्टिनी रेजिस्टन्स ऐवजी लेबनीज रेव्होल्यूशनचा उदय झाला, आणि तेथे हिजबुल्लाहचे इराणप्रणीत सरकार सत्तेवर आले. Iran Emerges as a Top Disinformation Threat in U.S. Presidential Race - The  New York Times

८०च्या दशकात सद्दाम हुसेनचा इराक हा एक मोठा धोका मानला जात असे. इस्रायल विरोधी भावना १९९०पर्यंत निर्माण  झाली नव्हती. इराण कॉन्ट्रा प्रोग्राममध्ये इस्त्रायली सरकार मध्यस्थ होते, असेही म्हटले जाते. या कार्यक्रमांतर्गत १९८० ते १९८८ दरम्यान इराकविरुद्धच्या युद्धात इराणला शस्त्रे पुरवण्यात आली होती. इराणने स्वतः अण्वस्त्रे बनवण्याचे  काम सुरू केल्याचे उघड झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडले. मध्यपूर्वेतील कोणत्याही देशाकडे अण्वस्त्रे असावीत, अशी इस्रायलची इच्छा नव्हती. पण खामेनी सरकार हट्टास पेटले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध आणखी ताणले गेले, पुढे याचे रूपांतर आता कट्टर शत्रुत्वात झाले. 

Desert Storm: 30 years on

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला 'शॅडो वॉर' म्हणतात, कारण दोन्ही देश थेट हल्ले करत नाहीत. एकेकाळी इराणशी संबंध असलेल्या इस्लामिक जिहादी गटाने अर्जेंटिनामधील इस्रायली दूतावास उडवून दिला होता. त्याच्या काही वेळापूर्वी हिजबुल्लाचा नेता अब्बास अल-मुसावी याची हत्या करण्यात आली होती. यासाठी मोसादवर आरोप ठेवण्यात आले होते. इराण समर्थक हमास नेता इस्माईल हनिया यांची तेहरानमध्ये अलीकडेच झालेली हत्या आणि हिजबुल्लाहचा प्रमुख कमांडर नसराल्लाह यांच्या हत्येलाही इस्रायल जबाबदार मानले जाते.

Iran vows revenge on Israel after Damascus embassy attack | Reuters

इस्रायलचा असा विश्वास आहे की हिजबुल्लाह हमास आणि हुथी बंडखोरांना निधी पुरवतो आणि इराणचा सर्वोच्च कमांडर अयातुल्ला खामेनी इस्रायलच्या विरोधात सेमेटिक संघटनांना भडकावतो. या दोघांमधील वैमनस्यातून आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा