आफ्रिका : पूर्व काँगोतील किवू सरोवरात उलटली प्रवासी बोट; ७० हून अधिक जणांचा बुडून मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th October, 03:26 pm
आफ्रिका : पूर्व काँगोतील किवू सरोवरात उलटली प्रवासी बोट; ७० हून अधिक जणांचा बुडून मृत्यू

गोमा-कीटुकू : क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्याने पूर्व काँगोमधील किवू सरोवरात प्रवासी बोड बुडाळ्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. यावेळी या बोटीत तब्बल २७८ प्रवासी होते. दरम्यान या घटनेच्या साक्षीदारांनी स्थानिक यंत्रणांना याबाबत माहिती दिल्यानंतर बचावकारी सुरू झाले. समोर आलेल्या आकड्यानुसार आतापर्यंत ७० हून अधिक जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर ५० पेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित बेपत्ता आहेत. 

सशस्त्र सेना आणि M23 बंडखोर गटातील युद्धामुळे गोमा आणि मिनोव्हा शहरात जाण्यासाठी असलेले रस्ते अत्यंत घातक बनले आहेत. याच मार्गावरून खाद्यपुरवठा आतसेच जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा होतो. दरम्यान सुरक्षित मार्गाच्या शोधात असलेल्या व्यापाऱ्यांनी किवू तलावातील सागरी मार्ग निवडला. हा मार्ग रस्ते वाहतुकीपेक्षा अधिक सुरक्षित आहे. पण, येथे काम करणारे बोट मालक पैश्यांच्या हव्यासापोटी सामान तसेच मालाची ओव्हरलोडिंग करून गोत्यात आणणारे कृत्य करतात. दरम्यान अशाच एका प्रयत्नात ही दुर्घटना घडली आहे.  


हेही वाचा