इराण : तरुणाईवर सुधारणामतवादी पाझश्कीयन यांचे गारूड; कट्टरपंथी जलिली यांचा पराभव

इराणमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पुरोगामी विचारसणीचे पुरस्कर्ते व हृदयरोगतज्ञ मसुद पाझश्कीयन यांचा दणदणीत विजय. उजव्या विचारसणीच्या सईद जलील यांचा त्यांनी पराभव केला. दिवंगत राष्ट्रपती इब्राहीम रायसी यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली होती.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th July, 10:34 am
इराण : तरुणाईवर सुधारणामतवादी पाझश्कीयन यांचे गारूड; कट्टरपंथी जलिली यांचा पराभव

तेहरान : सुधारणामतवादी  उमेदवार मसूद पाझश्कीयन यांनी शनिवारी इराणमधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यांनी कट्टरतावादी सईद जलिलींचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. पाझश्कीयन हे देशाचे माजी आरोग्य मंत्रीही राहिले आहेत. सुधारणांवर विश्वास ठेवणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. पाश्चात्य देशांशी संबंध सुधारण्यावर विश्वास ठेवणारे ते नेते आहेत. इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडल्या.Iran reformist Masoud Pezeshkian defeats hardliner Saeed Jalili in  presidential runoff - India Today

मसूद पाझश्कीयन यांनी निवडणुकीच्या वेळी पाश्चात्य देशांशी संबंध सुधारण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय, देशातील अनेक कायदे शिथिल करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले होते.  इराणमध्ये हिजाब आणि स्कार्फबाबत अनेक निदर्शनं झाली आहेत. पाझश्कीयन यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान शिया धर्मशाहीत बदल करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली जातील असेही म्हटले होते. Reformist Pezeshkian wins Iran's presidential runoff election, besting  hard-liner Jalili | World News - The Indian Express

इराणच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या मतमोजणीनंतर, पाझश्कीयन यांना १६.३ दशलक्ष मते मिळाली आहेत, तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आणि कट्टरपंथी नेते सईद जलिली यांना १३.५ दशलक्ष मते मिळाली आहेत. पाझश्कीयन यांनी जालिली यांचा तब्बल २८ लाख मतांच्या फरकाने पराभव केला. पाझश्कीयन हे माजी आरोग्य मंत्री राहिले आहेत आणि व्यवसायाने हृदयशल्यचिकित्सक देखील आहेत. Reformist candidate Pezeshkian leading in Iran's presidential elections

मसूद  पाझश्कीयन हे सुधारणावादी नेते म्हणून ओळखले जात असले तरी राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यानंतर त्यांच्यापुढील आव्हाने देखील बरीच वाढणार आहेत. पाश्चात्य देशांशी संबंध सुधारणे हे त्यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. जेव्हापासून इराणने अण्वस्त्र कार्यक्रम पुढे नेण्याचा इरादा व्यक्त केला आहे, तेव्हापासून त्याचे पाश्चात्य देशांशी संबंध बिघडले आहेत. इराणवर अनेक प्रकारचे व्यापारी निर्बंधही लादण्यात आले असून, त्यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फटका बसला आहे. Iran candidates Pezeshkian and Jalili hold final rallies ahead of  presidential runoff

अण्वस्त्रे तयार करता यावीत म्हणून इराण युरेनियम आणि इतर गोष्टींचे साठे सातत्याने वाढवत आहे, असे अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या पाश्चात्य देशांना वाटते. राष्ट्रपतीपद स्वीकारताच पाझश्कीयन यांना सर्वप्रथम इराणचे पाश्चात्य देशांशी नव्याने संधान साधावे लागेल. लादण्यात आलेले निर्बंधही संपुष्टात आणण्याच्या दिशेने काम करावे लागेल. देशात वाढलेली कट्टरता कमी करण्याच्या दृष्टीने देखील त्यांना कार्य करावे लागेल. इराणच्या तरुणाईने याच मुद्यांवर त्यांना निवडून दिले आहे. गेल्या १० वर्षांत इराणच्या तरुणवर्गाने आपल्या हक्कासाठी लढा दिला. याकाळात अनेकांना मृत्युदंड देखील ठोठावण्यात आला. यावेळी सरकारमध्ये आरोग्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या पाझश्कीय यांनी उघडपणे तरुणवर्गाचे समर्थन केले होते. यामुळे त्यांना पक्षांतर्गत कट्टरपंथीयांच्या विरोधाला देखील सामोरे जावे लागले. 

परदेशी धोरणाविषयी बोलायचे झाल्यास गाझा पट्टीत सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धाबाबत पाझश्कीयन यांची भूमिका काय असेल हेही पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.  इराण आणि इस्रायलमधील वाद काही कोणापासून लपलेला नाही. गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून इराणनेही अनेकदा इस्रायलवर हल्ला केला होता. याशिवाय इराण समर्थित हुथी बंडखोर आणि हिजबुल्लाहच्या सैनिकांनी सतत इस्रायली जहाजांना लक्ष्य केले आहे. हिजबुल्लाह दररोज लेबनॉनमधून इस्रायलवर रॉकेट डागत आहे. त्यामुळे पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. या आणि इतर अनेक कारणांमुळे मध्यपूर्व भागात भयाण अशांतता निर्माण झाली आहे. यावर देखील त्यांना तोडगा काढावा लागेल. ईरान-इज़रायल साइबर युद्ध वैश्विक हो गया 

हेही वाचा