राधानगरी तालुक्यातील कौलव येथे गुप्तधनासाठी अघोरी पूजा..! सहा जणांना अटक...

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात गुप्त धनाच्या लोभापोटी नरबळी देण्यासाठी अघोरी विधी सुरू होता ,गावच्या सरपंचांनी याची माहिती मिळताच पोलिसांना कळवले.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th July, 11:52 am
राधानगरी तालुक्यातील कौलव येथे गुप्तधनासाठी अघोरी पूजा..! सहा जणांना अटक...

राधानगरी: कोल्हापूर जिल्ह्यातील कौलव गावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गावातील एका घरात नरबळी देण्याची तयारी सुरू होती. यासाठी चार ते पाच फूट खड्डा खोदून अघोरी विधी चालू होता. याची माहिती मिळताच गावचे सरपंच रामचंद्र कुंभार व पंचसदस्य अनित पाटील यांनी पोलिसांशी संपर्क साधून प्रकरण उघडकीस आणले. काल मध्यरात्री राधानगरी पोलिसांनी अघोरी कृत्य करणाऱ्यांसह जमीनमालकाला अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. गुप्त धनाच्या हव्यासापोटी हा सर्व प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार;  कौलव गावातील शरद धर्मा माने आपल्या घरात गुप्त धन मिळवण्यासाठी अगोरी पूजा करत होता. यासाठी त्याने तांत्रिकांना बोलावले होते. गावच्या सरपंचांना यांची कुणकुण लागताच पंच आणि इतर ग्रामस्थांना सोबत घेत तत्काळ माने यांच्या घरी गेले. तेथे त्यांना देवांच्या मूर्त्यांसमोर ठेवलेले पूजेचे साहित्य आणि खोडलेला चार ते पाच फुट खोल खड्डा दिसला.Kolhapur News : पुरोगामी कोल्हापूर हादरलं! गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा  प्रकार

यावेळी तांत्रिक केळीच्या पानावर चटई ठेऊन हळद, कुंकू, सुपारी, नारळाची पाने आणि लिंबूमध्ये खिळे टाकून पूजा करत असल्याचे दिसून आले. संशयित आरोपी चंद्रकांत धुमाळ हा गळ्यात रुद्राक्षाची जपमाळ आणि कवड्यांची माळ घालून काही मंत्र म्हणत होता. त्याच्या शेजारी संशयित आरोपी शरद माने बसला होता. एकंदरीत प्रकारावरून नरबळी देण्याची तयारी सुरू असल्याचा संशय सरपंच आणि पंचांच्या मनात उत्पन्न झाला. Origin of black magic and its practices - Times of India

गावचे पंच पाटील यांनी तेथे उपस्थित असलेल्यांना या प्रकाराविषयी विचारले असता, संशयित आरोपी संतोष लोहार याने गुप्त धन मिळावे यासाठी आपण पूजा करत असल्याचे सांगितले. तेव्हा एक अन्य संशयित आरोपी आशीष चव्हाण याने सरपंच व इतर ग्रामस्थांना तेथून जा नाहीतर जिवानिशी जाल अशी धमकी दिली. यानंतर पंच अजित पाटील यांनी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली. यानंतर राधानगरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व आरोपींना अटक केली. सरपंच कुंभार व माजी उपसरपंच व पंचसदस्य अजित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या घरात काही धार्मिक विधी केले जात होते. arunachal pradesh kerala residents black magic case 3 found dead - India  Hindi News - थाली में बाल, काले ब्रेसलेट और हाथ पर कट के निशान; क्या काले  जादू ने ले ली

दरम्यान राधानगरी पोलिसांनी ६ आरोपींविरोधात, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.  १) शरद धर्मा माने वय ५२ रा. कौलव ता. राधानगरी २) महेश सदाशिव काशिद (तांत्रिक) वय ४५ रा.राजमाची ता. कराड जि-सातारा ३) अशिष रमेश चव्हाण वय ३५ रा. मंगळवार पेठ कराड जि. सातारा, ४) चंद्रकांत महादेव धुमाळ वय ४० रा. मंगळवार पेठ कराड जि-सातारा ५) संतोष निवृत्ती लोहार वय ४२ रा. वाझोली ता.पाटण जि-सातारा ६) कृष्णात बापु पाटील वय ५५ रा. पुलाची शिरोली ता. हातकणंगले अशा लोकांना अटक केली आहे. 

हेही वाचा