ब्रिटनची संसदीय निवडणुक: ऋषी सुनक यांच्या पक्षाचा दारुण पराभव; लेबर पक्षाची मुसंडी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th July, 04:02 pm
ब्रिटनची संसदीय निवडणुक: ऋषी सुनक यांच्या पक्षाचा दारुण पराभव; लेबर पक्षाची मुसंडी

लंडन : ब्रिटनच्या संसदीय निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षाला दारुण पराभवाला समोरे जावे लागले आहे. तर लेबर पक्षाने १४ वर्षांच्या कालावधीनंतर सत्तेत पुनरागमन करतांना तब्बल ३८९ जागा जिंकल्या. ऋषी सुनक यांनी जरी आपली जागा जिंकली असली तरी त्यांच्या कन्झर्वेटिव्ह पक्षाला फक्त १०१ जागा मिळवता आल्या. सुनक यांनी लेबर पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार सर केअर स्टार्मर यांचे अभिनंदन करत आपला पराभव मान्य केला. Sir Keir Starmer in the clear over office beer | The Independent

सुनक यांनी कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या पराभवाची जवाबदारी घेतली आहे. सर्व कन्झर्वेटिव्ह उमेदवारांनी या निवडणुकीत खूप मेहनत घेतली. स्थानिक पातळीवरील चांगले रेकॉर्ड आणि समाजाप्रती समर्पण असूनही निवडणुकीत आमचा पराभव झाला याबद्दल मी सर्वांची माफी मागतो असे ते म्हणाले. आज सद्भावनेने, शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने सत्तापरिवर्तन होईल, असे त्यांनी पुढे म्हटले. ब्रिटेन में ऋषि सुनक की हार! 10 पॉइंट्स में समझिए ब्रिटेन के चुनाव का पूरा  सार


हेही वाचा