दार्जिलिंग रेल्वे अपघात : कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक, आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th June, 10:21 am
दार्जिलिंग रेल्वे अपघात : कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक, आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू

दार्जिलिंग : पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे मागून भरधाव वेगात आलेल्या मालगाडीने रुळावर उभ्या असलेल्या कांचनगंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली.  या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. एनजेपीहून सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला सिलीगुडी ओलांडल्यानंतर रंगपनीर स्टेशनजवळ अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात रेल्वेच्या मागील बाजूच्या तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात आतापर्यंत १५  प्रवाशांचा मृत्यू तर ६० जण जखमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांचनजंगा एक्स्प्रेसला रंगपाणी आणि निजाबारी दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे. 

हेही वाचा .. 

रेल्वे अपघातात प्रचंड उपयोगी ठरतो 'हा' ४५ पैशांच्या प्रीमियमचा विमा; मिळते 'इतकी' भरपाई

या अपघातात दोन प्रवासी बोगी आणि एका पार्सल बोगीचे नुकसान झाले आहे. या घटनेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले आहे.  दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीडेवा भागात झालेल्या एका भीषण रेल्वे अपघाताबाबत समजल्यावर त्यांना धक्का बसला आहे. तपशिलांची प्रतीक्षा असली तरी, कांचनजंगा एक्स्प्रेसची मालगाडीशी टक्कर झाल्याचे वृत्त आहे. बचाव आणि वैद्यकीय मदतीसाठी डीएम, एसपी, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. युद्धपातळीवर कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये आणि जखमींना २.५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. अपघातात किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची भरपाई दिली जाईल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. 

या अपघातात एकूण १५  जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. यापैकी १२-१३ प्रवासी आणि ३ रेल्वे कर्मचारी आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये कांचनजंगा एक्स्प्रेसचा मालगाडी चालक, सहाय्यक चालक आणि गार्ड यांना आपला जीव गमवावा लागला आहे. घटनास्थळी बचावकार्य पूर्ण झाल्याचे रेल्वेने सांगितले. मार्ग मोकळा केला जात आहे. दरम्यान; रेल्वे अपघातानंतर १९ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मार्ग बदललेल्या ट्रेनमध्ये ट्रेन क्रमांक १२४२४ नवी दिल्ली-दिब्रूगढ राजधानी एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक २२३०१ हावडा-न्यू जलपाईगुडी वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे.


बातमी अपडेट होत आहे.