पियूष कप फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

शुभारंभी सामन्यात वेलांकणी स्पोर्ट्स कळंगुट विजयी

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
16th June, 12:38 am
पियूष कप फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

हरमल 'पियूष कप फुटबॉल' स्पर्धेतील सामनावीर बक्षीस देताना क्लबचे अध्यक्ष तथा माजी पंच प्रवीण वायंगणकर. सोबत अमित फर्नांडिस, पंच सांतान फर्नांडिस, किशोर नाईक, सायमन फर्नांडिस व जेसन फर्नांडिस.    

हरमल : येथील पियूष स्पोर्ट्स क्लब आयोजित पियूष कप फुटबॉल ९ ए साईड अखिल गोवा फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन हरमल चर्च फादर रोलंड लीन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंच सांतान फर्नांडिस, तुयेचे पंच किशोर नाईक, सायमन फर्नांडिस उपस्थित होते.            

हरमल पियूष कपचा पहिला सामना कार्मेल चर्च मैदानावर खेळविण्यात आला. या कपच्या शुभारंभी लढतीत वेलांकणी स्पोर्ट्स क्लब कळंगुट संघाने कोरगावच्या वॉरियर्स ब्रदर्स ए संघाचा २ विरुद्ध ० गोलनी पराभव केला. 

या लढतीतील आदर्श (कळंगुट) यास सामनावीर पुरस्कार देण्यात आले. स्पर्धेचे रेफ्री अमित फर्नांडिस तसेच जेसन फर्नांडिस व दियेतमार (बाबू) फर्नांडिस यांनी केले. प्रारंभी ज्युलियन रॉड्रिग्ज यांनी स्वागत केले व आभार मानले.