उदेश माजिकने पटकावले देशासाठी रौप्यपदक

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th June, 10:10 pm
उदेश माजिकने पटकावले देशासाठी रौप्यपदक

पणजी : गोव्याच्या उदेश माजिकने देशासाठी रौप्यपदक पटकावले. चीनमध्ये सुरू असलेल्या यूआयपीएम २०२४ पेंटाथलॉन आणि लेझर रन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कंबाईन टीम चॅम्पियनशिपमध्ये जिंकले पदक.

उदेश माजिकसोबत या संघात महाराष्ट्रातील करन मिलके आणि बिहारचा आदित्य आनंद यांचाही समावेश होता. चीनच्या झेंगझो ऑलिम्पिक स्टेडियममध्ये या चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते.

गोव्यातील ५ खेळाडूंची चीन येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली होती. यात बाबू गावकर, यश नाईक, वैष्णवी वाडकर, सोहा दलाल, उदेश माजिक यांची भारतीय मॉर्डन पेंटॅथलॉन संघात निवड करण्यात आली होती.