पंचवाडी शिरोडा येथे टँकर व कार यांच्यात अपघात; एकजण ठार तर तिघे जखमी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th May, 04:31 pm
पंचवाडी शिरोडा येथे टँकर व कार यांच्यात अपघात; एकजण ठार तर तिघे जखमी

शिरोडा  : मापा-पंचवाडी येथे शुक्रवारी दुपारी पाणीवाहू टँकरला खडीवाहू ट्रकची  धडक बसल्यानंतर टँकर एका कार ला धडकून रस्त्यावर उलटली. यात टँकर मधील महमद याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील ३ प्रवासी जखमी झाले आहेत . रस्त्याच्या मधोमध टँकर उलटल्याने अंदाजे ३ तास फोंडा - सावर्डे मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. अपघातानंतर कुडचडे व फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्राप्त माहितीनुसार जीए- ०१- झेड -१३०५ क्रमांकाची टँकर सावर्डे येथून पंचवाडी येथे जात होती. मापा येथील अरुंद रस्त्यावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या जीए - ०९-यु -३६४६ क्रमांकाच्या खडी वाहू ट्रकला टँकरने धडक दिली. ट्रकला धडकल्यानंतर चालकाचे नियंत्रण गेल्याने टँकरची धडक विरुद्ध दिशेने येणाऱ्या जीए -११- टी - ४५८३ क्रमांकच्या कारला बसून टँकर रस्त्यावर उलटला. यात टँकर मध्ये बसलेला महमद याचा जागीचा मृत्यू झाला. तर कार मधील तिघे जण जखमी झाले. जखमीना कुडचडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. 

अपघातानंतर सुमारे ३ तास सावर्डे ते फोंडा मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. याभागातून ये- जा करणाऱ्या प्रावशी वसेस सुद्धा अपघातामुळे अडकून  पडल्या. यामुले अनेक प्रवासी मापा ते सावर्डेपर्यंत चालतच गेले. अपघातानंतर कुडचडे व त्यानंतर फोंडा पोलीसांनी अपघात स्थळावर धाव घेतली. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला केल्यानंतर मार्गांवरील वाहतूक पूर्ण पदावर आली. 


हेही वाचा