राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सुफिया, शाहीन, सान्वीचे चमकदार यश

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd April, 12:05 am
राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सुफिया, शाहीन, सान्वीचे चमकदार यश

पणजी : राज्य मिनी आणि सब-ज्युनियर बॅडमिंटन मानांकन स्पर्धेत सुफिया शेख, शाहीन सी.के. आणि सान्वी औदी स्टार परफॉर्मर्स म्हणून उदयास आले. ही स्पर्धा इनडोअर स्टेडियम, कांपाल- पणजी येथे आयोजित करण्यात आली होती.

रेडियंट स्पोर्ट्स क्लब फोंडा आणि पणजी गणेशोत्सव समिती यांनी गोवा बॅडमिंटन असोसिएशन (जीबीए) आणि गोवा क्रीडा प्राधिकरण (एसएजी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील तरुण बॅडमिंटन खेळाडू सहभागी झाले होते व या स्पर्धेत त्यांनी आपली प्रतिभा दाखवली.

सुफिया शेखच्या शानदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. तिने १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरी आणि दुहेरी तसेच १७ वर्षांखालील आणि १९ वर्षाखालील मिश्र दुहेरी गटात विजय मिळवून एकूण चार किताब आपल्या नावावर केले. शाहीन आणि सान्वी यांनीही तिहेरी किताब जिंकून आपल्या पराक्रमाचे प्रदर्शन केले.

या स्पर्धेत आणखी काही प्रतिभावान खेळाडू होते ज्यांनी दुहेरी मुकुट जिंकून आपली चमक दाखवली. यश देसाईने १९ वर्षांखालील मुलांच्या एकेरी आणि दुहेरीत वर्चस्व गाजवले तर अमायरा धुमटकर (९ वर्षाखालील आणि ११ वर्षांखालील मुली एकेरी), अवनी ख्यालिया (१३ वर्षांखालील मुली एकेरी आणि दुहेरी), शेन डिसोझा (१५ वर्षांखालील मुले दुहेरी आणि मिश्र दुहेरी) आणि मोहम्मद उमर (१३ वर्षांखालील मुले एकेरी आणि दुहेरी) यांनी देखील आपापल्या श्रेणींमध्ये विजय मिळवून प्रभावित केले.

या स्पर्धेत विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या इतर प्रतिभावान खेळाडूंमध्ये अदिती धारगळकर, अद्वैत बालकृष्णन, आर्या मेत्री, अर्णव सराफ, अश्मीत पार्सेकर, जान्हवी विर्नोडकर, कोमल कोठारी, मायकल मारे, पलक रामनाथकर, प्रतीक नाईक बोटकर, शिवांजली थिटे, सोहम नाईक, सुधन्वा उडुपा, सिन्नोवहा डिसोझा, वरुण सहकारी, विहान सहकारी आणि विरादित्य पै काणे यांचा समावेश होता.

याशिवाय प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या उपविजेत्यांनाही सन्मानित करण्यात आले. यात अनव कन्नेकर, अन्विथा पुजारी, आशबा तहसीलदार, डिंपल रेवणकर, जान्हवी विर्नोडकर, कोमल कोठारी, लिनेश विर्नोडकर, मिनोष्का परेरा, मायरा डी नोरोन्हा, निहारिका डोगरा, निहारिका परवार. न्यासा धुपदाळे, ओम नंदनवार, पलक रामनाथकर, प्रज्ञा औदी, रुद्र फडते, समर्थ साखळकर, विश्व परब, शान सीके, शौर्य नाईक, शिवांजली थिटे, संभव भारद्वाज, सोहम नाईक, स्पर्श कोलवलकर, वेध लोटलीकर, आणि विश्व परब यांचा समावेश होता. शुभम स्वामी आणि देवज वायंगणकर यांना प्रॉमिसिंग प्लेयर बक्षीस देण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. केतन भाटीकर, गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संदीप हेबळे आणि आयोजक क्लबचे सदस्य नावेद तहसीलदार, जयवंत सराफ, साहिल कामत आणि विनायक कामत यांची समारोप सोहळ्यात उपस्थिती होती.