तीन आरोपी बनले 'सरकारी साक्षीदार' आणि बिघडला केजरीवालांचा खेळ, जाणून घ्या नेमकं काय घडलं

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात आतापर्यंत अटक झालेल्या १६ जणांपैकी सर्वात मोठे नाव अरविंद केजरीवाल यांचे आहे. केजरीवाल यांच्याशिवाय मनीष सिसोदिया वर्षभरापासून तुरुंगात आहेत. आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह हे देखील तुरुंगात असून १६ मार्च रोजी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या के. कवितालाही अटक करण्यात आली आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
23rd March, 03:27 pm
तीन आरोपी बनले 'सरकारी साक्षीदार' आणि बिघडला केजरीवालांचा खेळ, जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरवारी २१ मार्च रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली. ईडीतर्फे ही कारवाई दिल्ली मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी करण्यात आली. दरम्यान आम आदमी पक्षाचे वकील या खटल्याची तलगेच सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्नरत होते. मात्र, होळीच्या सुट्टीमुळे सर्वोच्च न्यायालय २३ मार्च ते ३१  मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने केजरीवाल यांना दिलासा मिळाला नाही. नंतर शुक्रवारी २२ मार्च  केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू येथील ईडी कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना २८ मार्च पर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. Delhi liquor scam: అమిత్‌ అరోరా రిమాండ్‌ రిపోర్టులో ఎమ్మెల్సీ కవిత పేరు |  ed included mlc kavithas name in delhi liquor scam

घोटाळ्यात सामील आरोपीच सरकारी साक्षीदार बनल्याने हायप्रोफाईल लोकांपर्यंत पोहोचली ईडी  

केजरीवाल यांनी पैसे हस्तांतरित करण्यासाठी हवाला ऑपरेटर्सचा वापर केल्याच्या खुलाशानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी रात्री त्यांना अटक केली. केजरीवाल यांच्या आधी आप, भारत राष्ट्र समिती (BRS) आणि YSR काँग्रेसच्या अनेक नेत्यांनाही अटक करण्यात आली आहे. याशिवाय अनेक मद्य कंपन्यांचे अधिकारी, सरकारी अधिकारी आणि इतरही तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत. यापैकी काही आरोपी सरकारी साक्षीदार बनल्याने तपास यंत्रणांना बळ मिळाले आहे. हे आरोपी सरकारी साक्षीदार झाल्यानंतरच सीबीआय आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना हायप्रोफाईल लोकांना अटक करण्यात यश आल्याचे सांगण्यात येते.Read all Latest Updates on and about Delhi Liquor Scam

आर्थिक तपास यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पादन शुल्क धोरणाचे उल्लंघन करून घेतलेले पैसे निवडणुका, बैठका आणि हॉटेलवर खर्च करण्यात आले. ईडीच्या म्हणण्यानुसार, केजरीवाल यांच्यासह त्यांच्या आपच्या इतर प्रमुख नेत्यांनी दिल्ली मद्य धोरणाच्या अनुषंगाने १०० कोटी रुपयांची लाच घेतली आणि ही रक्कम अनेक मध्यस्थांच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात आली. या प्रक्रियेत बीआरएस आमदार के. कविता आणि 'साऊथ ग्रुप'च्या सदस्यांचा समावेश होता. Arvind Kejriwal summoned by CBI for questioning in Delhi liquor policy case  on Sunday: Sources | Delhi Ncr News - News9live

पुरावे गोळा केल्यानंतर ईडीने ही अटक केली

केजरीवाल यांनी ईडीच्या नऊ समन्सकडे दुर्लक्ष केले होते, ज्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC) अंतर्गत न्यायालयात दोन खटले दाखल करण्यात आले होते. पुरावे गोळा केल्यानंतर ईडीने ही अटक केली. दरम्यान १६  मार्च रोजी ईडीने के. कविता यांना हैद्राबाद येथून अटक केली होती आणि तिच्या कोठडीची मागणी केली होती.Classic Case Of Abuse Of Power": K Kavitha vs Probe Agency In Court

त्या बीआरएस सुप्रीमो आणि तेलंगणाच्या माजी मुख्यमंत्री यांच्या कन्या आहेत. ईडीने घोटाळ्यातील ' संपूर्ण प्रकरणातील मुख्य कर्ता-धर्ता आणि लाभार्थी'  म्हणून त्यांचा कथित सहभाग उघड केला. ईडीने, कोठडीची मागणी करणाऱ्या याचिकेत, कविता, 'साउथ ग्रुप'च्या इतर सदस्यांसह - सरथ रेड्डी, राघव मागुंटा आणि मागुंटा श्रीनिवासुलु रेड्डी - यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि आपच्या इतर  प्रमुख नेत्यांशी संगनमत करत षडयंत्र रचले गेलेचा आरोप केला होता. . Read all Latest Updates on and about Delhi Liquor Scam Case

इंडो स्पिरिट्सला सर्वाधिक झाला फायदा 

ईडीने असाही आरोप केला आहे की कविता यांनी अरुण पिल्लईच्या माध्यमातून इंडो स्पिरिट्स या देशातील सर्वात मोठ्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या कंपनीमध्ये पुरेशी गुंतवणूक न करताच पेर्नोड रिकार्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वितरण व्यवसायात भागीदारी मिळाली. याच दरम्यान  दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यामुळे २०२१-२२  च्या कालावधीत इंडो स्पिरिट्सला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोट्यवधींचा नफा पोहोचला. दिल्ली सरकार ने HC से पेरनोड रिकार्ड की शराब लाइसेंस अस्वीकृति अपील को रद्द  करने को कहा | पुदीना

सरथ रेड्डी, राघव मागुंटा आणि मागुंटा श्रीनिवासुलु रेड्डी हे झाले सरकारी साक्षीदार झाले.

याव्यतिरिक्त, धोरणामुळे घाऊक विक्रेत्याचे  प्रॉफिट मार्जिन १२  टक्क्यांपर्यंत वाढवले व याचाच काही भाग लंच म्हणून परत घेतला . अवैध पैशांचा सतत ओघ निर्माण करण्यासाठी हे केले गेले. ईडीने दाखल केलेल्या अर्जात दावा करण्यात आला की आपला घाऊक विक्रेते आणि 'साउथ ग्रुप'ला दिलेली किकबॅक वसूल करण्यास आणि संपूर्ण घोटाळ्यातून नफा कमविण्यास सांगितले होते. सरथ रेड्डी, राघव मागुंटा आणि मागुंटा श्रीनिवासुलु रेड्डी या खटल्यात सरकारी साक्षीदार झाले होते.दिल्ली शराब घोटाला: इस सप्ताह तीसरी गिरफ्तार, YSR कॉन्ग्रेस सांसद का बेटा

ईडीने दावा केला आहे की, पीएमएलएच्या कलम ५० अन्वये नोंदवलेल्या श्रीनिवासुलु रेड्डी यांच्या १४  जुलै २०२३ च्या जबाबानुसार आणि कलम १६४  अंतर्गत नोंदवलेल्या त्यांच्या १७ जुलै 2023 च्या जबाबानुसार, के कविता आणि इतरांनी आपच्या नेत्यांना लाच दिली.दिल्ली शराब घोटाला: कविता ने इस्तेमाल किए 10 फोन, सब नष्ट?

दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यात आतापर्यंत झालेल्या १६ जणांपैकी सर्वात मोठे नाव अरविंद केजरीवाल यांचे आहे. केजरीवाल यांच्याशिवाय मनीष सिसोदिया वर्षभरापासून तुरुंगात आहेत. आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह हे देखील तुरुंगात असून १६मार्च रोजी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या के. कवितालाही अटक करण्यात आली आहे.Delhi Liquor Scam: कोर्ट ने BRS नेता कविता की ED हिरासत 26 मार्च तक बढ़ाई |  Moneycontrol Hindi

आता पर्यंत मद्य घोटाळ्याच्या अनुषंगाने १२ हायप्रोफाईल लोकांना अटक करण्यात आली आहे, ज्यात- (नेते आणि मंत्री वगळता )

१)आप कम्युनिकेशन विंगचे प्रमुख विजय नायर

२)साऊथ ग्रुपचे सदस्य राघव मागुंटा

३)साऊथ ग्रुपचे सदस्य अभिषेक बोनपल्ली

४)अकाली दलाचे माजी आमदार गौतम मल्होत्रा ​​यांचा मुलगा

५)इंडोस्पिरिटचे मालक समीर महेंद्रू

६)वड्डी रिटेलचे मालक अमित अरोरा

७)अरविंदो ग्रुपचे प्रवर्तक पी शरद रेड्डी

८)के. कविता यांचे सीए बुचीबाबू

९)बिनॉय बाबू, रेकॉर्ड इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख

१०)चॅरीएट प्रोडक्शन डायरेक्टर राजेश जोशी

११) रेस्टॉरंट चेन मालक दिनेश अरोरा

आणि 

१२)उद्योगपती अरुण पिल्लई

काय आहे दिल्ली मद्य घोटाळा?

१७ नोव्हेंबर २०२१ रोजी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने नवीन मद्य धोरण लागू केले होते. दारू व्यवसायात माफिया राजवट संपवण्यासाठी दिल्ली सरकारने आपल्या नवीन दारू धोरणाचे वर्णन केले होते. तसेच शासनाचा महसूल वाढविण्याचा युक्तिवादही करण्यात आला. पण दिल्ली सरकारचे नवीन दारू धोरण सुरुवातीपासूनच वादात होते आणि ते दिल्ली सरकारने २८ जुलै २०२२ रोजी रद्द केले होते.दिल्ली शराब नीति मामला: अब ख़त्म हो चुकी AAP सरकार की योजना में कथित घोटाला  क्या है? | समझाया | दिल्ली समाचार, टाइम्स नाउ

पण कथित मद्य घोटाळा ८ जुलै २०२२ रोजी दिल्लीचे तत्कालीन मुख्य सचिव नरेश कुमार यांच्या अहवालातून सर्वप्रथम उघड झाला होता. यात त्यांनी मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केल्याने कारवाई करण्यात आली. 

पुढे १७ ऑगस्ट २०२२  रोजी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. मनी लाँड्रिंगचा तपास करण्याच्या दृष्टीने एकंदर प्रकरणात आता कारवाई सुरू आहे. याच अनुषंगाने के कवितानंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.