मकडी

Story: बालचित्रवाणी |
21st January, 03:24 am
मकडी

 चेटकिणीच्या, राक्षसिणीच्या अशा अनेक कथा तुम्ही वाचल्या, ऐकल्या किंवा टीव्हीवर, चित्रपटात पाहिल्या असाल. पण तुम्ही भिंतीवर टुकूटुकू चालणारा, आपल्याच जाळ्यात लटकणारा कोळी चेटकीण झालेला पाहिलाय का? मग हा चित्रपट पहाच. तुम्हाला या चित्रपटात अशीच एक कोळीण चेटकिणीच्या स्वरूपात पाहायला मिळेल तिचं नाव असतं मकडी .

 चेटकीण म्हटल्यानंतर हा चित्रपट म्हणजे अगदी लहान मुलांना घाबरवून सोडणारा चित्रपट असेल असं वाटलं असणार! काही जणांनी “मी नाही रे बाबा” म्हणून नाक सुद्धा मुरडलं असणार. पण खरं तर हा चित्रपट आहे एका धाडसी मुलीचा आणि या चित्रपटात फक्त घाबरवणारी चेटकीण, किंवा मुलीचे साहस एवढंच नाही. तर यात आहे मजा, मस्ती, धमाल, कॉमेडी, इमोशन्स आणि त्याचबरोबर चेटकिणीची झालेली फजिती.

 चुन्नी आणि मुन्नी या दोघीही जोळ्या बहिणी असतात. त्यांना आई नसते. आपल्या बाबांसोबत आणि आजीसोबत त्या राहत असतात. चुन्नी असते शांत तर मुन्नी असते बरोबर तिच्या उलट स्वभावाची दंगेखोर, मस्तीखोर. गावातले सगळे तिच्या खोड्यांनी त्रासलेले असतात. अशातच एक दिवस चुन्नी गायब होते. मुन्नी या चुन्नीला शोधून काढेल का? मकडी चेटकीण नक्की काय करत असते आणि ती कोण असते हे पाहायचं असेल तर ‘मकडी’ हा चित्रपट नक्कीच बघ.

 नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ किंवा युट्युब वर हा चित्रपट पाहायला मिळेल.