गोवा विज्ञान केंद्र आणि प्लेनेटोरियम

Story: माझा गोवा |
26th November 2023, 03:14 am
गोवा विज्ञान केंद्र आणि प्लेनेटोरियम

मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्र आणि प्लेनेटोरियम हे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील शिक्षणाचे ठिकाण म्हणून सुप्रसिद्ध आहे. या विज्ञान केंद्राचे मुख्य उदिष्ट म्हणजे तुम्हा मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण करणे आणि त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांपर्यंत विज्ञानातल्या अद्भूत गोष्टी पोहचाव्यात. 

इथे प्रवास करताच तुम्हाला बागेत विविध मोठ्या आकारतले डायनोसोर्स आणि आदिम युगातले प्राणी पाहायला मिळतील.  आत गेल्यावर 'लाफिंग मिरर', 'फ्लोटिंग बॉल' यासारखे विविध गमतीशीर अनुभव तुम्ही घेऊ शकता. इथल्या प्रदर्शनातील वस्तु तुम्ही स्वतः हाताळू शकता किंवा चालवू शकता. खेळ खेळत विज्ञानाच्या अद्भूत गोष्टी जाणून घेता येतील आणि अनुभवताही येतील असे हे केंद्र असल्याने इथे मुलं आणि मोठेही हमखास जातात.

फक्त इतकेच नाही तर या इथे विज्ञानासंबंधित थ्री-डी फिल्म तुम्ही पाहू शकता. हे संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी अनुभव ठरेल असे हे मनोरंजक पिकनिकचे ठिकाण आहे आणि गोव्यातील नवीन पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे. सर्वांसाठी अनौपचारिक पद्धतीने विज्ञान शिकण्यासाठी हे ठिकाण चांगले आहे.

हे केंद्र मिरामर समुद्रकिनार्‍यापासून थोड्याच अंतरावर आहे. विज्ञान केंद्र सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत सर्वांसाठी खुले असते. प्रवेश शुल्क रुपये १५/- तर तारांगण शो किंमत २५/- रुपये व थ्री डी फिल्मची किंमत २०/- रुपये प्रती व्यक्ती आहे.


  • आदित्य सिनाय भांगी
    • साहाय्यक प्राध्यापक, हिंदी विभाग, गोवा विद्यापीठ