पक्ष कामगिरीत सुधारणा : राज्यात ४ वरून १० जागांवर घेतली झेप

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधी मतांच्या विभाजनामुळे काँग्रेसला सत्ता मिळवता आली नसली, तरी पक्षाच्या कामगिरीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. २०२० च्या निवडणुकीत केवळ ४ जागांवर समाधान मानाव्या लागलेल्या काँग्रेसने यंदा १० जागांवर विजय मिळवला आहे. पक्षासाठी हा निकाल एका ‘संजीवनी’प्रमाणे मानला जात आहे.
काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसची कामगिरी सुधारली आहे. भाजप सरकारविरोधातील जनतेचा असंतोष वाढत असल्याचे यातून सिद्ध होते. लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजपला यश मिळाले होते, मात्र जिल्हा पंचायतीत काँग्रेसने दक्षिण गोव्यात पुन्हा मुसंडी मारली आहे.
उत्तर गोव्यातील यश
उत्तर गोव्यात काँग्रेसने हळदोणा आणि शिरसई या दोन महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवला आहे. हळदोणा मतदारसंघात मॅरी मिनेझीस, तर शिरसई मतदारसंघात नीलेश कांबळी विजयी झाले.
दक्षिण गोंयांत वेळ्ळी -ज्युलिओ फर्नांडिस, बाणावली -लुईझा रॉड्रिग्ज, दवर्ली -फ्लोरियानो फर्नांडिस, गिरदोळी - संजय वेळीप, कुडतरी - अॅस्ट्रा डिसील्वा, नावेली - मालिफा कार्दोज,नुवे - अँथनी ब्रागांझा, गिरदोळी - संजय वेळीप हांका जैत मेळ्ळा.
दक्षिण गोव्यात काँग्रेसचे वर्चस्व
दक्षिण गोव्यात काँग्रेसने जोरदार पुनरागमन केले आहे. विशेषतः ख्रिस्ती धर्मीयांचे प्राबल्य असलेल्या सासष्टीत काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. दक्षिण गोव्यातील विजयी उमेदवारांमध्ये वेळ्ळीत ज्युलिओ फर्नांडिस, बाणावली- लुईझा रॉड्रिग्ज, दवर्ली- फ्लोरियानो फर्नांडिस, कुडतरी- अॅस्ट्रा डिसिल्वा, नावेली- मालिफा कार्दोजो, नुवे- अँथनी ब्रागांझा, गिर्दोली- संजय वेळीप.
मतविभाजनाचा फटका
सासष्टीमध्ये वर्चस्व राखले असले तरी, दक्षिण गोव्यातील फोंडा, काणकोण, मुरगाव, सांगे आणि केपे या तालुक्यात मात्र काँग्रेसला फटका बसला आहे. या भागांत विरोधी मतांचे विभाजन झाल्याने काँग्रेसचे उमेदवार विजयापासून दूर राहिले.