रेस्टॉरंटच्या माजी कर्मचाऱ्याकडून मालकाला २.२५ लाखांचा गंडा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
20th November, 12:03 am
रेस्टॉरंटच्या माजी कर्मचाऱ्याकडून मालकाला २.२५ लाखांचा गंडा

पणजी : आसगाव येथील बावरी रेस्टाॅरंटमधून माजी कामगारांनी २.२५ लाख रोख रक्कम लंपास केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी आशिष प्रताप सिंग या माजी कामगाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी रेस्टाॅरंटचे व्यवस्थापक अभिषेक शेट्टी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, १८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी रेस्टाॅरंट खुले केल्यावर ड्रॉवरात ठेवलेल्या २.२५ लाख रुपयांची चोरी झाल्याची समोर आले. त्यानुसार, रेस्टाॅरंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची छाननी केली असता, उत्तर प्रदेश येथील माजी कर्मचारी आशिष प्रताप सिंग याने १८ नोव्हेंबर २०२३ रोजी उत्तररात्री २.५६ वा. रेस्टाॅरंटच्या मागील बाजूचे दरवाजा तोडून आत प्रवेश केल्याचे समोर आले. त्यानंतर संशयिताने ड्रॉवर फोडून त्यात ठेवलेले २.२५ लाख रुपये लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याची दखल घेऊन हणजूण पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साहिल वारंग यांनी भादंसंच्या ३८० आणि ४५७ अंतर्गत संशयित आशिष प्रताप सिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा