क्षुल्लक वाद ठरला जीवघेणा; सांकवाळ येथे महिलेची आत्महत्या

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
51 mins ago
क्षुल्लक वाद ठरला जीवघेणा; सांकवाळ येथे महिलेची आत्महत्या

वास्को : स्वयंपाकघरात पती पत्नीमध्ये वाद झाल्यावर २७ वर्षीय पत्नीने बेडरूममध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे ओडिशाचे परंतु कामधंद्यानिमित्त सांकवाळ येथे सदर पती- पत्नी राहतात. २३ डिसेंबरला रात्री १० वाजता जेवणानंतर पती पत्नीमध्ये स्वयंपाकघरात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यामुळे संतापलेली पत्नी बेडरुममध्ये गेली. तिने आतून दरवाजा बंद करून छताच्या पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतला. दरम्यान, पतीने बेडरुमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तथापि, ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांना मदतीला बोलाविले. त्यांनी दरवाजा फोडून आत प्रवेश केला असता महिलेने गळफास घेतल्याचे दिसून आले. शेजाऱ्यांनी तिला खाली उतरवून उपचारासाठी कासावली आरोग्य केंद्रात नेले. तेथून तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक कॅव्ही फर्नांडिस पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा