लालू बोक्याच्या गोष्टी

Story: पुस्तकांच्या दुनियेत |
19th November 2023, 04:18 am
लालू बोक्याच्या गोष्टी

माधुरी पुरंदरे यांची लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके अतिशय वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखी आहेत. लहान मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांनादेखील हसवणारी आणि खिळवून ठेवणारी आहेत. साधे सोपे विषय, सरस अशी त्यांनी स्वतः काढलेली चित्रं यामुळे त्यांची पुस्तकं अगदी सुंदर आहेत. 

निलू आणि पिलू लालूचे खूप लाड करायच्या. निलूनं त्याला एक घास दूध-भात घातला की पिलू दोन घास घालायची. छान लोणी लावलेला पाव निलूनं दिला की पिलू त्याला आपल्यातलं बिस्किट खाऊ घालायची. अशा रीतीनं खाऊनखाऊन लालू बोका चांगला गलेलठ्ठ झाला होता. खायचं न् झोपायचं. खाण्यासाठी उठायचं न् खाऊन पुन्हा झोपायचं. असा त्याचा कार्यक्रम होता. अशा या लालूच्या तीन गोष्टी नक्कीच वाचा.

पुस्तक : लालू बोक्याच्या गोष्टी

लेखक : माधुरी पुरंदरे 

प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन

पृष्ठ : ३६ 

किंमत : १२०/- रुपये