ड्रग्जच्या नशेतील मॉडेलला आरोपीकडून बेदम मारहाण, महिला होती गर्भवती
लॉस एंजेलिस : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडासारखी एक घटना अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये घडली आहे. येथील ३१ वर्षीय मॉडेल मलेशा मुनीची तिच्या राहत्या घरात निर्घृण हत्या करुन तिचा मृतदेह फ्रीजमध्ये कोंबण्यात आला होता. ही मॉडेल दोन महिन्यांची गर्भवती होती.
मॉडेलच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल आता समोर आला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मृतावस्थेत आढळलेली ही मॉडेल दोन महिन्यांची गर्भवती होती.
१२ सप्टेंबर रोजी लॉस एंजेलिसमधील तिच्या अपार्टमेंटमध्ये ती मृतावस्थेत आढळून आली होती. मृत्यूपूर्वी तिला मारहाणही करण्यात आली होती. मलेशा मुनीच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, पाठीवर आणि डाव्या हाताला जखमा झाल्या होत्या. तिच्या शरीरात बेंझॉयलेकगोनिन सारख्या औषधांची तसेच कोकेथिलीन आणि इथेनॉलचे मिश्रण असल्याचे दिसून आले. मृत्यूआधी दारू आणि ड्रग्जच्या नशेत असणाऱ्या मॉडेलला आरोपीने बेदम मारहाण केल्याचा अंदाज आहे.
दिल्लीतील श्रद्धा मर्डरप्रमाणेच १२ सप्टेंबरला मुनीचा मृतदेह फ्रीजमध्ये सापडला होता. तिचे तोंड टेपपट्टीने बंद करण्यात आले होते. हात आणि पाय बांधून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये कोंबण्यात आला होता.