९ महिन्यांत २,०९० अपघात, २१० जणांनी गमावले प्राण

सरासरी दिवसाला ८ अपघात : दर ३१ तासांत एकाचा मृत्यू


27th September, 12:00 am
९ महिन्यांत २,०९० अपघात, २१० जणांनी गमावले प्राण

प्रतिनिधी । गोवन वार्ता                                                

पणजी : राज्यात १ जानेवारी ते  २५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत २,०९० अपघातांची नोंद झाली असून यांतील १९३ भीषण अपघातांत २१० जणांचा मृत्यू झाला आहे.  ही आकडेवारी पाहता दिवसाला सरासरी ८ अपघांत तर ३१ तासांत सरासरी एकाचा अपघाती मृत्यू होत आहे. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये ९७ (४.४३ टक्के) अपघात कमी झाले, मात्र अपघाती मृत्यू ३२ (१७.९७ टक्के) अधिक झाले आहेत. याशिवाय राज्यात नोंद होणाऱ्या १० अपघातांत सरासरी एकाचा मृत्यू होत आहे.                  

राज्यात १ जानेवारी ते  २५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत २,०९० अपघातांची नोंद झाली आहे. यात १९३ भीषण अपघात आहेत. वरील कालावधीत एकूण २१० जणांचा अपघातांत मृत्यू झाला आहे.  याशिवाय १८७ अपघातांत २८० जणांना गंभीर दुखापत झाली आहे. राज्यभर झालेल्या ३८४ किरकोळ अपघातांत ६०६ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. शिवाय १,३२६ अपघातांत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. २०२२ मध्ये वरील कालावधीत २,१८७ अपघातांची नोंद झाली होती. त्यात १६४ भीषण अपघातांची नोंद आहे. वरील कालावधीत एकूण १७८ जणांचा अपघातांत मृत्यू झाला होता. त्यामुळे २०२३ मध्ये २०२२ च्या तुलनेत ९७ (४.४३ टक्के) अपघात कमी झाले. मात्र अपघाती  मृत्यूंमध्ये ३२ (१७.९७ टक्के) वाढले आहेत. याशिवाय १४५ अपघातांत १७१ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. राज्यभर २०२२ मध्ये झालेल्या ३८४ किरकोळ अपघातांत ५७७ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. शिवाय १,४९४ अपघातांत वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. 

राज्यात मागील २५ दिवसांत १६३ अपघातांची नोंद झाली आहे. त्यात सहा भीषण अपघात आहेत. या अपघातांत ८ जणांनी जीव गमावला आहे. २१ अपघातांत २७ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय वरील कालावधीत ४३ अपघातांत ६० जणांना किरकोळ दुखापत झाली. ९३ अपघातांत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. वरील कालावधीत २०२२ मध्ये १७५ अपघातांची नोंद झाली होती. त्यात १२ भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला होता. २० अपघातांत २५ जणांना गंभीर दुखापत झाली होती. याशिवाय वरील कालावधीत ४२ अपघातांत ५४ जणांना किरकोळ दुखापत झाली होती. १०१ अपघातांत वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.


हेही वाचा