माझा बाप्पा

Story: माझी डायरी | अनय येर्लेकर |
24th September, 03:35 am
माझा बाप्पा

गणपतीची मूर्ती घरी आणताना आम्हा मुलांना फार फार आनंद होतो. जोपर्यंत बाप्पा घरी असतात तोपर्यंत  खूप मजा करतो. बाप्पा घरी येण्यापासून विसर्जनापर्यंत सवयीप्रमाणे फटाके वाजवण्यात आम्ही मुले हरवून जातो की नाही. फटाक्यांमुळे प्रदूषण होते हे विसरून जातो. फटाक्यांच्या प्रदूषणाने आपला परिसर दूषित होतो. नाका तोंडात फटाक्याचा धूर गेला तर आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. फटाक्यांच्या  नादात गणपतीबद्दल सांगायचे राहून गेले. 

गणपती बाप्पामुळे घरातील सर्वजण एकत्र जमतात. खूप छान वाटते. गणपतीची आरास, माटोळीला लावलेली पाने, फुले, फळे किती सुंदर दिसतात. आपण समाधानाने बाप्पासमोर हात जोडले तर बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतो. बुद्धीची देवता असणारे गणपती बाप्पा आपल्या घरातीलच होऊन जातात. मूर्ती विसर्जनाच्या वेळी मूर्ती बरोबर इतर गोष्टी पाण्यात टाकतो त्यामुळे प्रदूषण होते. हे बाप्पा आम्हाला तुझे स्वागत करताना किंवा विसर्जन करताना निसर्गाची हानी होणार नाही याची बुद्धी दे आणि सर्वांनी आनंदात ठेव.