बाप्पाचे आगमन

Story: माझी कविता। रमेश वंसकर |
17th September, 12:35 am
बाप्पाचे आगमन


 बाप्पाच्या आगमनाची

 लागता चाहूल

तयारीस लागती सारे

 दिनरात जागून

 सजवले मखर

रंगीत नक्षीदार

पताका लावल्या

घरभर सुंदर

 सजवली माटोळी

फळा फुलांनी

हरणे फुलांचा

त्यावर साज

 बाप्पांना बसवले

चौरंगावर खास

धूपदीप कर्पूर

लामणदिवा समई

 मंद प्रकाशात

तेजाळली छबी

बाप्पास आवडती 

मोदक करंज्या 

 पंचखाद्याचा नैवेद्य खास

 भजन आरत्या फुगड्यांचा

चालतो जल्लोष

 भुईचक्र नारिंगे

चंद्रज्योती बाण

 मुले पेटवती हर्षुन

 भजन आरत्यात

दंगून गेला बाप्पा

विसर्जनाच्या वेळी

जड होते मन

 बाप्पा पुढच्या वर्षी

तुम्ही या लवकर

आनंदात ठेवा

तुमच्या लेकरास