लँड फॉर जॉबप्रकरणी लालूंवर होणार गुन्हा दाखल

केंद्र सरकारची सीबीआयला परवानगी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
12th September 2023, 07:39 pm
लँड फॉर जॉबप्रकरणी लालूंवर होणार गुन्हा दाखल

नवी दिल्ली :‘लँड फॉर जॉब्स’प्रकरणी माजी रेल्वेमंत्री लालू यादव यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून सीबीआयला परवानगी मिळाली आहे. सीबीआयने महिनाभरापूर्वी लालू यादव यांच्यावर खटला चालवण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली होती.

माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात कथित जॉब फॉर जॉब प्रकरणी नव्या आरोपपत्राबाबत गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्याचे सीबीआयने मंगळवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सांगितले. लालूंव्यतिरिक्त आम्ही तीन रेल्वे अधिकाऱ्यांवर खटला चालवण्याची परवानगी मागितली होती. आठवडाभरात ती मिळण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रावर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात मंगळवारी होणारी सुनावणी २१ सप्टेंबर रोजी होणार आहे.

जॉब्सच्या बदल्यात या जुन्या प्रकरणात लालू यादव, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि कन्या आणि खासदार मीसा भारती हे आधीच जामिनावर आहेत. नव्या प्रकरणात लालू आणि राबडी देवी यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

हेही वाचा