‘आदित्य एल-१’चा सूर्याच्या कक्षेत प्रवेश

भारताच्या सौर मोहिमेबाबत इस्रोने दिली अपडेट

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
03rd September 2023, 11:26 pm
‘आदित्य एल-१’चा सूर्याच्या कक्षेत प्रवेश

बंगळुरू : आदित्य एल-१ हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी २ सप्टेंबर रोजी अंतराळात पाठवण्यात आले. या मोहिमेबाबत इस्रोने मोठी अपडेट दिली आहे. आदित्य एल-१ यानने स्वत: कक्षेत बदल करत सूर्याच्या दिशेने जण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
इस्रोने भारताच्या महत्त्वाकांक्षी सौर मिशन आदित्य एल-१ने रविवारी पाहिल्यांदा आपली कक्षा बदलली आहे. आदित्य एल-१ ने पृथ्वीच्या त्याच्या २३५X१९५०० किमीच्या कक्षेतून आता २४५X२२४५९ किमीच्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रवेश केला. याद्वारे यानाने सूर्याच्या दिशेने जाण्याचे पहिले पाऊल टाकले आहे. आदित्य एल-१ सहा दिवसांच्या कालावधीत पाच वेळा आपली कक्षा बदलून त्यानंतर एल १ बिंदूकडे झेप घेईल.
शनिवारी २ सप्टेंबर रोजी सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित झाल्यानंतर केवळ ६३ मिनिटे आणि १९ सेकंदाच्या कालावधीत आदित्य एल-१ ला पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आले होते. रविवारी या यानाचे थ्रस्टर्स फायर करून त्याची कक्षा बदलली आहे. आदित्य एल-१ चे संपूर्ण नियंत्रण पृथ्वीवरून केले जात आहे. हळूहळू आदित्य एल-१ आपली कक्षा आणखी चार वेळा बदलेल.
आदित्य एल-१ चे मार्गक्रमण
* पुढील यानाची कक्षा ही ५ सप्टेंबर रोजी केली जाणार आहे. १६ दिवस पूर्ण झाल्यावर आदित्य यान सूर्याच्या अभ्यासाठी एल १ या बिंदूकडे जाण्यासाठी मार्गक्रमण करेल.
* आदित्य उपग्रह साधारपणे १८ सप्टेंबरपर्यंत पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे. या दरम्यान तो पृथ्वीभोवती फेऱ्या मारून गती प्राप्त करेल.
* पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर आदित्य अंतराळातील एल १ या पॉइंटच्या दिशेने आपला प्रवास सुरू करेल. या पॉइंटवर पोहोचण्यासाठी त्याला सुमारे चार महिने लागतील.
* इस्रोच्या मते, ६ जानेवारी २०२४ पर्यंत आदित्य एल-१ एल-१ पॉइंटवर पोहोचेल. आदित्य एल-१ सोबत सात पेलोड पाठवण्यात आले आहेत. हे मिशन केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचा