दिवाडी बेटावर दारू पिऊन दंगामस्ती

१४ जणांना अटक : जामिनावर सुटका

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th May 2023, 12:07 am
दिवाडी बेटावर दारू पिऊन दंगामस्ती

पणजी : जुने गोवा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील दिवाडी बेटावर दारू पिऊन दंगामस्ती करणाऱ्या १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना ताकीद देऊन नंतर जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्थानकाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मध्यरात्री ते पहाटेपर्यंत पर्यटक तसेच काही नागरिक दारू पिऊन दंगामस्ती करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शनिवारी रात्री दिवाडी बेटावरील सुमारे १२ ठिकाणी धडक कारवाई करून सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन दंगामस्ती करणाऱ्या १४ जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्या १४ जणांना अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
जुने गोवा पोलिसांनी अशाच प्रकारची कारवाई गेल्या आठवड्यात रायबंदर, खोर्ली तसेच जुने गोवा चर्च परिसर व इतर परिसरात केली. या परिसरातून सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन दंगामस्ती करणाऱ्या १० जणांना ताब्यात घेतले होते.             

हेही वाचा