वीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व खंबीरपणा, मोठेपणाने नटलेले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’चा १०१ भाग

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th May 2023, 11:53 pm
वीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व खंबीरपणा, मोठेपणाने नटलेले

नवी दिल्ली : वीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व खंबीरपणा आणि मोठेपणाने नटलेले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. कबीर दास, एनटी रामाराव यांच्याविषयीही मोदींनी चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचा रविवारी १०१ वा भाग प्रसारीत झाला. पंतप्रधान म्हणाले की, ‘मन की बात’चा हा भाग दुसऱ्या शतकाची सुरुवात आहे. १०० व्या भागाच्या प्रसारणाच्या वेळी, संपूर्ण देश एका धाग्यात बांधला गेला होता. ‘मन की बात’ने सर्वांना एकत्र आणण्याचे काम केले. जेव्हा मन की बात प्रसारित झाली तेव्हा जगातील विविध देश आणि टाइम झोनमधील लोकांनी ती ऐकली. मी हजारो मैल दूर असलेल्या न्यूझीलंडमधील एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये १०० वर्षांची आई आशीर्वाद देत आहे. लोकांनी कल्पना मांडल्या आणि विधायक विश्लेषण केले.

मागील भागात आपण मन की बात मध्ये काशी तमिळ संगम, सौराष्ट्र तमिळ संगम बद्दल बोललो होतो. काशी तेलुगू संगमही काही काळापूर्वी वाराणसीमध्ये झाला होता. असाच एक अनोखा प्रयत्न देशात करण्यात आला आहे.

यावेळी मोदींनी अरुणाचलमधील ग्यामर न्योकुम व बिहारच्या विशाखा यांच्याशी संपर्क साधला. आहेत.

आपल्या नुकत्याच झालेल्या जपान भेटीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी हिरोशिमामध्ये होतो. तिथे मला हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियमला ​​भेट द्यायला मिळाली. संग्रहालयात कधी नवे धडे मिळतात तर कधी खूप काही शिकायला मिळते. काही दिवसांपूर्वी भारतात आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पोचेही आयोजन करण्यात आले होते. यात जगभरातील १२०० हून अधिक संग्रहालयांचा समावेश होता. गुरुग्रामच्या म्युझियम कॅमेऱ्यापासून ते कोलकात्याच्या व्हिक्टोरिया मेमोरिअल आणि दिल्लीच्या वॉर मेमोरियलपर्यंत देशातील संग्रहालयांचीही चर्चा केली.

दहा नवीन संग्रहालयांची उभारणी

पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाविषयी सांगितले. तसेच आदिवासी बंधू-भगिनींचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान सांगितले. स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी बंधू-भगिनींच्या योगदानाला वाहिलेली दहा नवीन संग्रहालये देशात बांधली जात असल्याचे त्यांनी सांगितले. व्हिक्टोरिया मेमोरियलची बिप्लोबी भारत गॅलरी, जलियावाला बाग मेमोरियलच्या नूतीकरणाविषयीही मोदी यांनी चर्चा केली.