निवड लॅम्पची

घर लहान असो वा मोठे, आपल्याला आपले घर सजवायला आवडते, यासाठी आपण लॅम्पसारख्या अनेक वस्तू खरेदी करतो, त्या आपल्या घराला प्रकाश तर देतातच पण घराचे सौंदर्यही वाढवतात. कोणत्याही बेडरूममधील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे नाईटस्टॅन्ड!

Story: घराबद्दल बरेच काही | गौरी भालचंद्र |
19th May 2023, 09:09 pm
निवड लॅम्पची

पलंगाच्या बाजूला नाईटस्टँड ठेवण्याची प्रथा आहे. नाईटस्टँड वॉर्डरोब तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या नाईटस्टँडच्या वरची जागा वापरू शकता. हा रात्रीचा दिवा मंद प्रकाश देतो, ज्यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही. तुम्ही झोपेत असतानाही ते चालू ठेवू शकता. हा दिवा दिसायला खूप सुंदर वाटतो आणि खोलीचे सौंदर्य देखील वाढवतो. तो खूप कमी वीज वापरतो. थंड प्रकाश उत्सर्जित करत असल्यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही. यामुळे तुमच्या खोलीला डेकोरेटिव्ह लुक मिळेल.

अतिशय सुंदर रंग बदलणारे एलईडी लॅम्पसुद्धा सध्या बाजारात आलेले आहेत. विशेषतः लहान मुलांच्या खोलीत ठेवण्यासाठी योग्य एलईडी दिवे. ते इंद्रधनुष्याच्या आकारातही उपलब्ध आहेत. हे भेटवस्तू म्हणून देखील तुम्ही कुणालाही देऊ शकता. खोलीच्या सजावटीसाठी हा सुंदर नाईट लॅम्प बर्‍याच प्रमाणात उपयुक्त ठरू शकतो. चंद्राचा आकार असलेला एक नाईट लॅम्प मिळतो ज्यात रंग बदलण्याचा पर्याय आहे. तो 3D डिझाइनमध्ये उपलब्ध आहे. ओमचा सुंदर आकार असलेला एक मल्टी कलर लाइट दिवा खूप आरामदायी आहे आणि चांगली झोप घेण्यास उपयुक्त ठरू शकतो.

विशेषत: काही विद्यार्थ्यांसाठी जे अनेकदा घरी उशिरापर्यंत अभ्यास करतात, त्यांच्यासाठी डेस्क लॅम्प मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरतो. त्याचा आकार भिन्न भिन्न असतो आणि तो अधिक सुंदर दिसतो, विशेषत: काही खास डेस्क लॅम्प ऑफिसमध्ये किंवा अभ्यासात ठेवता येतो, अधिक दर्जेदार असतो. घरातील दिवाणखान्यात सुंदर लॅम्पची सजावट खूप सुंदर भासते. लॅम्पशेड्सचे विविध प्रकार आपले लक्ष वेधून घेतात.

हिमालयीन सॉल्ट लॅम्प घराच्या सजावटीसाठी वापरले जातात. सॉल्ट लॅम्प हा हिमालयात आढळणाऱ्या नैसर्गिक खडकाच्या मिठाच्या तुकड्यांपासून बनलेले असतो आणि हा एक विद्युतीय लॅम्प असतो. जर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये सॉल्ट लॅम्प ठेवला तर ते खोलीतील वातावरण प्रदूषित होण्यापासून वाचवते आणि वातावरण स्वच्छ ठेवते. त्यामुळे आपले मन सकारात्मक होण्यासाठी मदतच होते. असे लॅम्प एकाग्रता वाढवण्यास मदत करतात. मूड चांगला करण्यासाठी हा लॅम्प आपल्याला फार फायदेशीर ठरतो. हा लॅम्प आपल्याला उत्तम झोपेसाठी सहाय्यक होतो. त्यामुळे आपल्या घरासाठी हा लॅम्प फायदेशीर ठरतो. 

एलईडी टच लॅम्प, ग्रीन नेचर लॅम्प, मून नाईट प्रोजेक्टर दिवा, बऱ्याचदा देव्हाऱ्यात किंवा नाईट लॅम्प म्हणून झिरोच्या बल्बचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. या बल्बचे आयुष्यही फार असते. तो बराच काळ चालतो. खोलीतील मंद प्रकाशासाठी बेडसाइड दिवा म्हणून हा उपयोगी पडू शकतो.

आपल्याला काम करताना किंवा वाचन करताना आपण त्याला हव्या त्या दिशेने फिरवू शकतो असा हा फ्लोअर लॅम्प देखील भरपूर प्रकाश देतो. तसेच शेल्फच्या आकारातील लॅम्प आपल्याला बहुउपयोगी ठरतो आणि घरातील जागेची बचतही होते. आर्क फ्लोअर लॅम्प आपल्याला एक सुरेख प्रकाश देऊ शकतात.

टेबल टॉपसह असलेला फ्लोअर लॅम्प सुंदर दिसतो आणि वस्तू साठवताना उपयोगी पडतो. अनेक प्रकारचे फ्लोअर लॅम्प उपलब्ध असतात. आपल्याला आपल्या घरासाठी, तेथील विविधांगी उपयोगासाठी कशा प्रकारचा लॅम्प उपयोगी ठरू शकेल याचा पूर्ण विचार करूनच आपण खोल्यांच्या उपयोगानुरूपच लॅम्पची निवड केली पाहिजे. तरच आपल्या घराला त्याचा चांगला उपयोग होतो. झुंबर लॅम्प आपल्या घराला अजून आकर्षक बनवण्यासाठी एक योग्य पर्याय आहे पण आपल्या घराचा आकार कसा आहे यावरच तो साजेसा दिसेल की नाही ते ठरत असतं. 

काही लॅम्पचे डिझाइन युनिक आहेत. तीन ते चार लॅम्प असलेलेही सेट असतात. लॅम्प वेगवेगळ्या आकाराचे असतात, शिवाय प्रत्येक दिव्याची लांबी स्वतंत्रपणे कमी जास्त करता येते. घराला या लॅम्प्समुळे एक सुंदर असा हटके लुक मिळण्यास मदत होते. घराला अगदी रॉयल आणि राजेशाही भासवणारेही बरेच लॅम्प आपल्या पाहण्यात येतात. ते मनमोहक तर असतातच पण घरात पाऊल पडताच पाहणाऱ्यांचे लक्षही वेधून घेत असतात.  यातील प्रकाशाचे कवडसे छान वाटतात.

नव्या घरात राहायला गेल्यासारखा उत्साह त्या विविध प्रकारच्या लॅम्प्सकडे पाहताक्षणी येतो आणि मनाला एक वेगळाच रॉयल फील येतो. घरात सजीवता निर्माण व्हायला मदत होते. काही ठिकाणी प्रखर उजेड, तर काही ठिकाणी मंद; लिविंग रूममध्ये वेगळा, तर बेडरूम आणि हॉलसाठी त्यांना साजेसे असे विविधांगी लॅम्प आपल्या मनाला एक सुखद अनुभूती देतात आणि घरातील वातावरण प्रसन्न करण्यास अजूनच मदत करतात.