अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या


27th March 2023, 12:54 am
अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

मुंबई : अभिनेत्री आकांक्षा दुबेने वाराणसीतील एका हॉटेलात आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री शूटिंग संपवून आकांक्षा हॉटेलमध्ये गेली. तिथे गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब रविवारी उजेडात आली. तिने हे पाऊल का उचलले हे समजू शकले नाही.

आकांक्षा भोजपुरी सीनेसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा होती. रविवारी सकाळी मेकअप मॅनने आकांक्षाला फोन केला. तिने प्रतिसाद न दिल्याने तो थेट हॉटेलवर गेला. तिथे आकांक्षा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आकांक्षाने सकाळपासून नाश्त्याचा ऑर्डर दिला नाही. त्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. तेव्हाही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, त्यांनी पोलिसांना पाचारण केले.

आकांक्षाला बालपणापासूनच नृत्य व अभिनयाची आवड होती. ती सोशल मीडियावर नेहमीच आपल्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असे. आकांक्षा भोजपुरी सीनेसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा होती.

हेही वाचा