हरमल येथे घरावर माड पडून हानी

पंचायतीकडून आर्थिक मदतीची अपेक्षा


24th March 2023, 12:33 am
हरमल येथे घरावर माड पडून हानी

गिरकरवाडा-हरमल दांडो येथील घरावर मोडून पडलेले माड.

वार्ताहर। गोवन वार्ता

हरमल : येथील गिरकरवाडा दांडो भागात ग्रेसी फर्नांडिस यांच्या राहत्या घरावर माड पडून अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. पंचायतीकडून आर्थिक मदत मिळावी, अशी विनंती फर्नांडिस कुटुंबाने केली आहे.      

बुधवार, दि. २२ रोजी सायं. ७ च्या सुमारास हरमल व नजीकच्या भागात सोसाट्याचा वारा गेल्याने गिरकरवाडा दांडो भागात ग्रेसी फर्नांडिस यांच्या राहत्या घराच्या व्हरांड्यावर माड मधोमध मोडला व घरावर पडला. यात घराच्या दर्शनीभागाची नासधूस झाली. यामुळे लाकडी सामान, कौले आदी मिळून १० हजार रुपयांचे नुकसान झाले.      

सुदैवाने जीवितहानी झाली नाही. त्याचवेळी घरातील मंडळी आतील खोलीत प्रार्थना करण्यात गुंग होती. त्या भागाचे पंच तथा सरपंच बर्नार्ड फर्नांडिस यांनी घराची पाहणी केली. पंचायतीमार्फत आर्थिक मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. तलाठी नाईक यांनीही घराची पाहणी केली.

हेही वाचा