अक्षयच्या ‘ओह माय गॉड २’चे पोस्टर प्रसिद्ध


16th March 2023, 11:34 pm
अक्षयच्या ‘ओह माय गॉड २’चे पोस्टर प्रसिद्ध

‘ओह माय गॉड’ म्हणजेच ‘ओएमजी’ हा अक्षय कुमारच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. याचा सिक्वेल बनवण्याची मागणीही जोरात सुरू आहे. सिक्वलच्या प्रतीक्षेत असलेल्या अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाचा सीक्वल म्हणजेच ओएमजी-२ लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण यात एक वळण आले आहे.
या चित्रपटाने अक्षय कुमारच्या चित्रपट कारकिर्दीला नवे आयाम दिले. अक्षय कुमारने त्याच चित्रपटाचा भाग २ चित्रपटगृहात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पोस्टरच्या रूपात चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करण्यासोबतच ही माहितीही देण्यात आली आहे. ओह माय गॉड २ लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपट तज्ज्ञ क्रिस्टोफर कनागराज यांनी ट्विट केले आहे. हे प्लॅटफॉर्म वुट/जिओ सिनेमावर प्रदर्शित केला जाऊ शकतो.
हे ट्विट शेअर होताच चाहत्यांनी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची मागणी केली. ओएमजी २ आधीच ट्विटरवर ट्रेंड करत आहे ज्यामध्ये काही चाहत्यांनी कमेंट केली आहे की हा चित्रपट थिएटरसाठी योग्य आहे. थिएटरमध्ये रिलीज करा. अक्षयचा सतत फ्लॉप होत जाणारा चित्रपट पाहून काही चाहत्यांनी लिहिले आहे की आगामी चित्रपट देखील ओटीटीवर प्रदर्शित केले तर बरे होईल.