नावेलीत बाथरूमच्या खिडकीतून महिलेचे चित्रीकरण; मडगाव पोलिसांत संशयितावर गुन्हा दाखल

मांडोप-नावेली येथे २८ वर्षीय विवाहितेचे बाथरूमच्या खिडकीतून लपून चित्रीकरण करणाऱ्या ४८ वर्षीय संशयितावर मडगाव पोलिसांत गुन्हा दाखल.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
नावेलीत बाथरूमच्या खिडकीतून महिलेचे चित्रीकरण; मडगाव पोलिसांत संशयितावर गुन्हा दाखल

मडगाव : मांडोप-नावेली येथे एका २८ वर्षीय विवाहितेचे बाथरूमच्या खिडकीतून मोबाईलद्वारे लपून चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयित रियाझ अहमद सी. चिक्केरूर (वय ४८) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित महिला आपल्या घरातील बाथरूममध्ये असताना संशयिताने खिडकीच्या फटीतून मोबाईल कॅमेऱ्याद्वारे तिचे चोरून चित्रीकरण केले. हा प्रकार अचानक महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने तातडीने मडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली.

महिलेच्या तक्रारीच्या आधारे मडगाव पोलिसांनी संशयित आरोपी रियाझ अहमद सी. चिक्केरूर याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष गावकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा