राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता

महाराष्ट्र ते केरळ दरम्यान तयार झालेले टर्फ, अंदमानच्या समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा व अन्य वातावरणीय कारणांमुळे राज्यात २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी होण्याची शक्यता आहे. शनिवारी पणजीत पणजीत कमाल ३२.५ अंश तर किमान २५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता

पणजी : महाराष्ट्र ते केरळ दरम्यान तयार झालेले टर्फ, अंदमानच्या समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा व अन्य वातावरणीय कारणांमुळे राज्यात २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी होण्याची शक्यता आहे. शनिवारी पणजीत पणजीत कमाल ३२.५ अंश तर किमान २५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

शनिवारी मुरगावमध्ये कमाल तापमान ३२.८ अंश व किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३१ ते ३३ अंश तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यात २० तसेच २४ आणि २५ सप्टेंबर दरम्यान तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात १ जून ते १९ सप्टेंबर दरम्यान सरासरी ७८ इंच पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात यंदा पावसाचे प्रमाण ३१.८ टक्क्यांनी कमी आहे. वरील कालावधीत धारबांदोडामध्ये सर्वाधिक १०८.४४ इंच पावसाची नोंद झाली आहे. वाळपईमध्ये १०८.२५ इंच तर सांगेमध्ये १०२.४७ इंच पावसाची नोंद झाली आहे.


हेही वाचा
सर्व पहा