एकता हीच भारताची ताकद

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तरुणांशी संवाद

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
29th January 2023, 11:31 pm
एकता हीच भारताची ताकद

नवी दिल्ली : “देशात एकमेकांत मतभेद आणि फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, आपण सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. एकता हीच भारताची ताकद आहे, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे.
दिल्लीतील कॅन्टोन्मेंटमधील करिअप्पा मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या तरुणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला.
‘बीबीसी’ने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. बीबीसीने ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाच्या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावरून देशात बराच गदारोळ सुरू आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचक प्रतिक्रिया देत इशारा दिला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारतमातेच्या मुलांमध्ये फूट पाडण्यासाठी अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. पण, देशातील लोकांमध्ये कधीही मतभेद होणार नाहीत. यासाठी एकता हाच अंतिम पर्याय आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.