सरूं या न्हय मुखार ?

२९ जानेवारी २०२३ रोजी दुसरे आदिवासी साहित्य संमेलन केपे येथे पार पडणार आहे. ज्येष्ठ आदिवासी कोकणी साहित्यिक पांडुरंग काशीनाथ गावडे या आगळ्यावेगळ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. आजवर उपेक्षित राहिलेल्या आदिवासी साहित्याबद्दल तळमळ आणि अपेक्षा व्यक्त करणाऱ्या त्यांच्या या अध्यक्षीय भाषणाची प्रत्येक सुजाण वाचकाने नोंद घ्यायलाच हवी.

Story: विशेष | पांडुरंग काशीनाथ गावडे |
28th January 2023, 11:02 pm

विद्वानांना आणि सर्वांना  मनःपूर्वक अभिवादन!

पंधरा महिन्यांपूर्वी, ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी, आम्ही अशा पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनासाठी रवींद्र भवन, मडगाव येथे जमलो होतो. पहिल्या परिषदेचे अध्यक्षस्थानी बी. आर. प्रतापसिंह कुष्टा वेळीप होते. एक ’दवरणे’ (वजन ठेवण्याचे स्थान) झाल्यानंतर ते वजन मी माझ्या डोक्यावरून उचलले आहे. पुढील ’दवरणे’ किती लांब आहे हे मला माहीत नाही. वजन मात्र जड आहे. हे सत्य आहे…

गोव्यात विविध साहित्य संमेलने होतात. नुकतेच ३ व ४ डिसेंबर रोजी सालेली सत्तरी येथे साहित्य मंथन सत्तरी आयोजित तिसरे ग्रामीण साहित्य संमेलन पार पडले. ट्रायबल रिसर्च सेंटर गोवा आणि गोवा आदिवासी साहित्य संघ, दुसरे आदिवासी साहित्य संमेलन घेणार असल्याची माहिती मिळाल्यावर एका प्रश्नावर चर्चा सुरू होती. 'हे आणि कोणते नवे ’नाडेपेन्ना’ करण्यासाठी पुढे आले आहेत? अशा वेगळ्या अधिवेशनाची गरज काय? आपल्या आत अशा भिंती उभ्या केल्या तर त्या भाषेच्या आणि साहित्याच्या कामात अडथळे निर्माण होणार नाहीत का?” प्रश्न अगदी साधा आणि स्वाभाविक होता. पण उत्तर तितकेच अवघड आहे! भिंती कोणी बांधल्या आणि भिंती कोणी बांधल्या? भिंती उभ्या केल्या आणि कुंपण बांधले, तर त्या पाडण्याची जबाबदारी बांधणाऱ्याची नाही का?

आदिवासी समाज हा नेहमीच  कोणाच्यातरी वजनाखाली चिरडत जगला आहे. मुर्वतीन जगताना त्याला मान खाली घालून चालण्याची सवय झाली. साहित्य निर्मितीच्या बाबतीत आम्ही नुकतेच बालक अवस्थेत आहोत. ’कूस’ बदलायला लागलो आहोत. पोट ओडण्याचे, कोणाचे तरी बोट धरून पाऊल मारून पुढे चालायचे आहे. पुढे नंतर धावणार, स्पर्धेत सहभागी होणार आणि स्पर्धेत टिकून राहतील की काय? हे काळ ठरविणार. आमच्या पूर्वजांच्या कित्येक पिढ्या वाल्याचा शेवटचा कपडा तोंडात घालून मौन बाळगून राहिला. मात्र आता सुशिक्षित झाल्याने नव्या पिढीला आत्मसन्मानाचा प्रकाश दिसला आहे. त्यांना त्यांच्या वडीलधारी लोकांनी सांभाळून ठेवलेल्या संपत्तीचा मार्ग मिळाला आहे. कथा, कविता, नाटक, ललित साहित्य लिहायचे, ’जागराच्या मांडार’ जागराच्या  बरोबर एक नाटक लिहून सादर करायचे प्रयत्न ते करत आहेत. पण मागच्या अनुभवासाठी या प्रकाशित ’मांडार’ चढायला त्यांना संकोच वाटत आहे. त्यांच्या मनातून हा संकोच दूर करण्यासाठी आणि त्यांना एक विश्वास निर्माण करून देण्यासाठी व सुरक्षित मंच तयार करून देण्यासाठी या प्रयत्नांचे स्वागत केले पाहिजे.

 पोर्तुगीजांच्या ’बाटाबाटी’ च्या काळात आणि त्यानंतर आजपर्यंत आगीच्या धगीत सर्वात जास्त होरपळून गेला तो आदिवासी समाज. इतरांनीही  हे त्रास सहन केले. आणि आपले अनुभव, कथा व व्यथा साहित्याच्या माध्यमातून व्यक्त केल्या. मा. ॲड. उदयबाब भेंब्रे यांच्या ’व्हडलेंघर’ कादंबरीत त्यांचे ह्रदय आणि मन मोकळे झाले आहे. आदिवासी समाजावर सर्वांनीच दुर्लक्ष केले. दुसऱ्या समाजातील लेखकांनी काही प्रमाणात विशेषतः कवितेतून यावर प्रकाश टाकला त्यात  राजय  पवार यांची ‘खण  गावड्या खण’  ही कविता,  मा. र. वि. पंडित यांची ’आयलें तशें गायलें’ आणि  ’म्हजें उतर गावडयाचें’ या सारख्या कवितांचा उल्लेख  करू शकतो. पण त्या माध्यमातून आमच्या व्यथांना योग्य न्याय दिला गेला असे म्हणणे योग्य ठरणार नाही. पण ज्या क्षणी आदिवासी समाजातील लेखक कुठलाच संकोच न ठेवता हातात पेन घेऊन लिहितील तेव्हाच या दुःखाच्या सागराला वाहण्यासाठी खरी वाट मिळणार आहे हे नक्कीच. यासाठी त्यांना उत्तेजन देणे आणि नवी दिशा दाखवणे ही काळाची गरज आहे. मराठी साहित्यात दलित लेखकांनी आपल्या  लेखनातून ती शक्ती प्रदर्शित केल्याचे आम्ही बघितले आहे.

या मंचावरून बोलताना मला जबाबदारीची जाण आहे. तसेच मर्यादीचेही भान आहे. चेष्टा करण्यासाठी कोणीही एक प्रश्न उपस्थित करून शकतो की कुठल्या साहित्याच्या आदारावर संमेलने भरवण्यासाठी तुम्ही पुढे आला आहात? किंवा, कुठले साहित्य आणि किती लेखक आहेत? त्यांनी साहित्यात कुठली भर घातली आहे? पण असे प्रश्न करणाऱ्यांचीही चूक नाही. खरंच! साहित्य म्हणजे नेमके काय याचा विचार करण्याची गरज आहे. फक्त पुस्तकात लिहिलेली कथा, कविता, कादंबरी, नाटक म्हणजेच साहित्य काय? ३ ऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. संदेश  प्रभुदेसाई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात खूप चांगल्या प्रकारे या बाबतीत आपले विचार प्रकट केले.

एक चांगले घर बांधण्यासाठी मजबूत पायाची गरज असते. प्रत्येक साहित्यिकाला एक चांगला वैचारिक पाया असणे गरजेचे आहे. लोकवेद, लोकगीते, लोककथा म्हणजे माती खाली असलेल्या साहित्याचा पाया! रामायण, महाभारत यासारखे ग्रंथ जसे लिखित स्वरूपात नसून सुद्धा लोकांच्या मनात जागा करून राहिले, तसेच आमच्या पूर्वजांनी सांभाळून ठेवलेली लोकनाट्य, जागोर, बनवड, शिगम्यांतल्यो जती, लोककथा, म्हणी, ओपारी, गाळी-फस्ती, शेतातली, कुळागरातली, गोरवां राखण्याली, भाडेल्यांली आणि पाडेल्यांची ’उतरावळ’  हे सर्व साहित्य म्हणून मानावे लागणार. जर ते साहित्य नव्हते तर त्याचा अभ्यासात समावेश झाला नसता. शास्त्रोक्त नजरेने त्याचा अभ्यास आणि मांडाणी करून लोकांना प्रोफेसर होऊन शिकवायला मिळाले नसते. त्यांना डॉक्टरेट करायला मिळाली नसती. मान –सन्मानही मिळाला नसता.

 आमचे दायज नक्कीच खूप मोठे आहे. ‘पांवळेचें उदक पाडसाक चडोवपांची धमक आसली आनी माथ्यावरल्या झऱ्याचे उदक उशेणाचो गुडडो सोडून पाटांपाटांनी खेळोवन आनी, फोंणयां – फोंणयांनी  नाचोवन शेवाफोंणी  शिपपाचें कसब  तांचे  कडेन आसलें. तन आनी मन उकतें आसलें.’’ सोबतीला ’बडी’, कोयतुल, हिळो, कुराडें, तासणी, फलासणी, इन्ने, किल्लकांतने , कुदळ , खोरें, पिकास, पानकुदळ, नांगर, जूं गुटो, दातें,  कांब, लवंग,  पारय, घण, शेणे, शेल, कानी , दावण, राजू, वेटो ही आयुधे होती आणि  ती चांगल्या प्रकारे वापरण्याची बुद्धी होती.  पण  मनगटात  ताकद  असूनसुद्धा तीन  बोटांनी  लेखणी धरण्याची शक्ती आणि पांढऱ्यावर  काळे  करण्याची अक्कल  तेवढी नव्हती. मुर्वत, भिजूडपणा आणि नेहमीच धनीपणाच्या शेकातळात वावरण्याचा जन्मजात शाप असल्या कारणाने नेहमीच वरच्या दडपणाखाली, मान खाली  घालून नव निर्मितेचे काम म्हणजे  भाटकरांची सेवा  करण्यात  धन्यता मानून  घेण्यास सगळे  जीवन समाप्त केले. नव्या  पिढीला  व्यक्त होण्याची इच्छा आहे.  त्यांना मोकळे व मुक्त व्यासपीठ पाहिजे,  म्हणून एकत्र येण्याचा हा एक लहानसा प्रयत्न.

‘खुंटी  मारून  मठी जोडपी’  ही आमची  मिरास. दर्याला बांद  घालून दर्या अडवून  खाजनां  पिकवून

खाऱ्या  पाण्यालाही  गोड करून  दाखवण्याचा चमत्कार आम्ही करू शकतो,  ही आमची  विज्ञानाची  देणगी. तर  कोकणी भास ही आम्ही इतरांकडून घेतलेली नाही.  ती  आमची  निजाची आहे.  आता यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे.

’’पोल्ल्यापोंदा खंय तरी  कीट  गोबरापोंदा  लिपून  रावल्या  तिका  फुंकार घालून  पेटोवया. व्हारे  उस्तुचे  पडल्यार तेवुय  उस्तुया. वयर सरतल्यो 'कयल्यो'  ‘जाणभाशेंत’ इतियास  उलयतल्यो. दिवली  पेटोवन  पाट मांडपाचो  वगत आयला, सरूं या  न्हय मुखार ?...’’