साहित्य:
२ मोठ्या वाट्या चाळलेले पातळ पोहे.
१ मध्यम वाटी शेंगदाणे.
१ बारीक वाटी डाळ (फुटाण्याची डाळ).
१ मोठी वाटी सुक्या खोबऱ्याचे बारीक चिरलेली काप.
१ मोठी वाटी काजू.
१ बारीक वाटी बारीक चिरलेल्या मिरच्या.
२० ते ३० कडीपत्ताची पाने.
चिमूटभर हिंग.
२ बारीक चमचे हळद.
१ बारीक चमचा जिरं पूड.
१ मोठा चमचा साखरेची पूड.
चवीनुसार मीठ.
तेल.
कृती:
प्रथम एका पसरट भांड्यात चाळलेले पातळ पोहे घ्या. हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्या. भाजलेले पोहे मोठ्या परातीत काढून घ्या. आता त्याच भांड्यात २ बारीक वाट्या तेल तापत ठेवा. तेल तापले की त्यात शेंगदाणे घाला व खरपूस होईपर्यंत छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या आणि भाजलेल्या पोह्यात घाला. याचप्रमाणे डाळ, सुकं खोबरं आणि काजू भाजून घ्या व हे सगळे जिन्नस पोह्यामध्ये घाला.
आता पुन्हा २ बारीक वाट्या तेल घ्या आणि तेल तापले की त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, कडीपत्त्याची पाने, चिमूटभर हिंग, हळद आणि जिरं पूड घाला. हे सगळं छान तडतडलं की पोह्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर वरून साखरेची पूड आणि चवीनुसार मीठ घाला. शेवटी हे सगळे जिन्नस छान एकत्र करा.
या दिवाळीला नक्की करून पहा.
संचिता केळकर