मोपा विमानतळाला पर्रीकरांचे नाव!

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th December 2022, 12:29 Hrs
मोपा विमानतळाला पर्रीकरांचे नाव!

पणजी : आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाला माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला सादर केलेला आहे. त्यानुसार केंद्राने विमानतळाचे नावही निश्चित केले आहे, अशी माहिती भाजपमधील सूत्रांकडून मिळाली.
येत्या ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोपा विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पास कोणाचे नाव द्यावे यावरून राज्यात थेट तीन गटही तयार झाले होते. एका गटाकडून पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर, दुसऱ्या गटाकडून मनोहर पर्रीकर, तर तिसऱ्या गटाकडून जॅक सिक्वेरा यांचे नाव देण्याची मागणी होत होती. अखेर पर्रीकर यांच्याच नावाचा प्रस्ताव केंद्राने मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.