येत्या ९, १० रोजी पावसाची शक्यता

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd December 2022, 10:40 pm
येत्या ९, १० रोजी पावसाची शक्यता

पणजी : दक्षिण अंदमानजवळ समुद्रात वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्याच्या प्रभावाने बंगालच्या उपसागरात आग्नेय दिशेला कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. परिणामी ७ व ८ डिसेंबर दरम्यान तामिळनाडू व आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. याचा गोव्यावर फारसा परिणाम होणार नसला तरी वातावरण दमट राहणार आहे. ढगाळ वातावरण तयार होऊन राज्यात ९ व १० डिसेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. २ व ३ तारखेला सिंधुदुर्ग परिसरात ढग तयार झाले होते. मात्र, ते फारसे नसल्याने पाऊस झाला नाही, अशी माहिती हवामान खात्याचे शास्त्रज्ञ राहुल मोहन यांनी दिली. शनिवारी पणजीत कमाल ३३.८ अंश डिग्री सेल्सिअस व किमान २४. अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुरगावमध्ये कमाल ३२.६ व २४.५ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा