नदाव यांच्या टिप्पणीला तीन समीक्षकांचा पाठिंबा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd December 2022, 10:38 Hrs
नदाव यांच्या टिप्पणीला तीन समीक्षकांचा पाठिंबा

पणजी : इफ्फीच्या समीक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा इस्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लापीद यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाबद्दल मांडलेल्या मताला आता याच मंडळाचे सदस्य जिंन्को गोतोह यांनी पाठिंबा देणारे ट्विट शनिवारी जारी केले आहे. या ट्विटर हँडलवर त्यांनी स्वतःसह पास्केल चॅव्हन्स आणि झेव्हियर अँगुलो बार्चुरेन या सदस्यांनी स्वाक्षरी केलेले पाठिंब्याचे संयुक्त निवेदनही जारी केले आहे. हे वृत्त एका राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
वरील ट्विटमुळे नदाव यांनी केलेले विधान हे त्यांचे केवळ वैयक्तिक मत नव्हते, असे स्पष्ट होत आहे. दरम्यान, नदाव यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर केलेली टिप्पणी त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याचा समीक्षक मंडळातील अन्य सदस्यांशी काहीही संबंध नाही, असे याच मंडळातील भारतीय समीक्षक सुदीप सेन यांनी मांडले होते. पण, आता पाचपैकी तिघांनी नदाव यांच्या टिप्पणीला पाठिंबा जाहीर केला आहे.