आकर्षक स्वयंपाक घर…

स्वयंपाक घर हे महिलांचं घरातलं हक्काचं ठिकाण. घर कसं सजवायचं हे घरातल्या इतर मंडळींच्या हातात असलं तरी स्वयंपाक घराचं डेकोरेशन करताना सगळी मर्जी चालते ती घरातल्या बाईची. म्हणूनच तुमची ही हक्काची जागा अशी छान डेकोरेट करा की स्वयंपाक घरातलं काम म्हणजे तुमच्यासाठी एन्जॉयमेंट असेल, काम करताना तिथे तुमचं मन रमेल.

Story: घराबद्दल बरेच काही । गाैरी भालचंद्र |
18th November 2022, 11:17 pm
आकर्षक स्वयंपाक घर…

असं म्हणतात की, स्वयंपाक करताना जर बाईचं मन प्रसन्न असेल, तर तिच्या हातचं अन्न खाऊन आपोआपच सगळं घर प्रसन्न होतं. त्यामुळेच स्वयंपाक घरात आल्यावर तुम्हाला छान फ्रेश वाटायला हवं. म्हणूनच स्वयंपाक घरात भरपूर लाईट लावण्याची व्यवस्था करून घ्या. भरपूर उजेड असला की आपोआपच छान फिलिंग येतं.

घरात जर जिवंत झाडं ठेवली तर घर लाईव्ह वाटू लागतं तसंच आपल्या स्वयंपाक घराचंही आहे. ओट्याजवळच्या खिडकीत किंवा डायनिंग टेबलवर किंवा मग स्वयंपाक घरातला असा एखादा कॉर्नर जिथे चांगला स्वच्छ प्रकाश येतो, तेथे तुम्ही एखादं इनडोअर प्लान्टचं रोपटं ठेवलं, तर तुमचं स्वयंपाकघर खरोखरंच लाईव्ह वाटू लागेल. 

आजकाल घर सजविण्यासाठी जसे शोपीस मिळतात, तसेच स्वयंपाक घर सजविण्यासाठीही मिळतात. असे शोपीस ऑनलाईन साईटवर उपलब्ध आहेत. यापैकी काही शोपीस घ्या आणि स्वयंपाकघरातल्या मोकळ्या भिंतींवर लावा. यामुळे तुमच्या किचनचा लूक नक्कीच बदलेल.  स्वयंपाक घरात नॅपकिन अडकविण्यासाठी किंवा काही गोष्टी लटकविण्यासाठी हँगर असतात. या हँगर ऐवजी जर असे शोपीस असणारे हुक वापरले तर नक्कीच ते अधिक आकर्षक दिसतील. स्वयंपाक घरात आवश्यक तेवढा प्रकाश येईल याची काळजी घ्या. स्वयंपाक घराचे द्वार गॅस आणि फ्रीजसमोर येणार नाही याकडे लक्ष द्या. स्वयंपाकघर भोजनकक्षाला लागून असेल तर या दोघांमध्ये पडदा लावा. स्वयंपाकघर अन्य खोलीशी लागून असेल तरीही एका दाराला पडदा लावा. स्वयंपाकघराचे घरात फारच महत्त्वाचे स्थान आहे. कारण संपूर्ण कुटुंबासाठी याच ठिकाणी स्वयंपाक तयार केला जातो आणि हाच आहार प्रत्येकाला शक्ती देतो. त्यामुळे घरातील सदस्याला काम करण्याची ऊर्जा मिळते.

मिक्सर, मायक्रोवेव्ह, हॅण्डमिक्सी, इंडक्शन अशा अनेक इलेक्ट्रिक गोष्टी स्वयंपाक घरात असतात. वस्तू अनेक आणि प्लग मात्र एकच असेही होते. म्हणूनच सध्या ज्या वस्तूंचे वायर कनेक्ट केलेले नसतात, ते तुम्ही अशा पद्धतीने अडकवून ठेवू शकता. हे शोपीस स्वयंपाक घरात खूपच देखणे आणि स्टायलिश दिसते, गॅस स्वयंपाकघरातील महत्त्वपूर्ण भाग आहे. कारण गॅसवरच गृहिणी कुटुंबाकरिता स्वयंपाक तयार करीत असते. स्वयंपाक तयार करताना दार दिसेल अशाच ठिकाणी गॅस ठेवा.

हे शक्य नसेल तर दार दिसेल अशा रितीने आरसा लावा. गॅसजवळ काम करताना थकवा यायला नको. या जागी गृहिणीला थकवा जाणवत असेल तर गॅस एका कोपऱ्यात असण्याची शक्यता आहे. ही समस्या सोडविण्यासाठी तांबे किंवा एखादा पारदर्शी धातू लटकवून मोठी जागा असल्याचा आभास निर्माण करा. हा आपल्या घरातील महत्त्वपूर्ण भाग असतो. आपलं शरीर हे पोटावर चालतं आणि या उदरभरणाची सोय स्वयंपाकघरात केली जाते, ज्यामुळे आपण तंदुरुस्त राहतो. बरेचदा घाईगडबडीत काम उरकताना स्वयंपाकघरात आपण स्वयंपाक करायचं काम नेमाने करतो परंतु तेथील स्वच्छतेकडे आपल्याला हवे तसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे स्वयंपाकघर अस्वच्छ दिसते. स्वयंपाकघरातील प्लॅटफॉर्म नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी, काम करताना प्लॅटफॉर्मवर प्लास्टिकची पिशवी लटकवून ठेवा आणि काहीही कापल्यानंतर त्या पिशवीत त्याचा कचरा टाका. असे केल्याने प्लॅटफॉर्म नेहमी स्वच्छ राहील.

हात पुसण्यासाठी कोरडे टॉवेल्स किंवा शक्य असल्यास डिस्पोजेबल पेपर नॅपकिन्स वापरले तरी चालतील.  किचनचा दरवाजा, किचनमध्ये केबिनेट असेल तर त्याचे हँडल आणि फ्रीजचे हँडल स्वच्छ करण्यासाठी एक मग पाण्यामध्ये एक टीस्पून क्लोरीन ब्लीच मिसळा आणि स्वच्छ कापडाने घासून घ्या.   स्वयंपाकघरात हात पुसण्यासाठी वापरलेले नॅपकिन्स बदलत राहा. दिवसभर एकाच नॅपकीनचा वापर करू नका. स्वयंपाकघरात शेडवाले बल्ब लावू नका, कारण त्यामुळे स्वयंपाकघरात प्रकाश पूर्णतः पसरत नाही. किचन कॅबिनेटला आतून वार्निशने रंगवा. असे केल्याने किटक आणि झुरळे येणार नाहीत. किचन कॅबिनेट स्वच्छ करण्यासाठी एक चतुर्थांश कप गरम पाण्यात समप्रमाणात लिंबाचा रस मिसळून कॅबिनेट स्वच्छ करा. गंज वा तेलाचे चिकट डागही लिंबाच्या रसाने साफ होतात. तुमच्या किचनमध्ये मायक्रोवेव्ह, कुकिंग रेंज, ओव्हन इत्यादी वस्तू असतील तर त्यांच्या एका बाजूला किमान  सें.मी. जागा सोडा. किचन सिंकमधून येणारा वास टाळण्यासाठी, त्यात रंगीत आणि सुगंधित नॅप्थालीन बॉल्स घाला.  किचन सिंकमधील डाग साफ करण्यासाठी अर्धा कप पाण्यात 3-4 चमचे व्हिनेगर मिसळा आणि सिंकमध्ये लावून थोडावेळ असेच राहू द्या. नंतर ते वर्तमानपत्राने पुसून टाका.  किचनमधील सिंक जाम झालं असल्यास, मीठ आणि सोडा  समप्रमाणात मिसळून सिंकच्या होलमध्ये टाका. नंतर 1 टीस्पून डिटर्जंट घाला. 15 मिनिटांनंतर गरम पाण्याचा एक तीक्ष्ण प्रवाह घाला आणि नंतर थंड पाणी घाला. सिंक पूर्णपणे स्वच्छ होईल. सिंकमधील डाग इत्यादी साफ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरा.   किचनच्या टाइल्सवर साचलेली घाण साफ करण्यासाठी स्पंज किंवा मऊ कापडावर थोडी डिटर्जंट पावडर टाकून त्याने टाइल्स घासून कोमट पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर त्या पुसून कोरड्या करा.

स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कपड्यांचा चिकटपणा दूर करण्यासाठी, डिटर्जंटमध्ये अर्धा कप अमोनिया घालून कपडे धुवा.   स्वयंपाकघरातील खिडक्या स्वच्छ करण्यासाठी, एक तृतीयांश कप व्हिनेगरमध्ये एक चतुर्थांश कप अल्कोहोल मिसळा आणि या मिश्रणाने खिडक्या स्वच्छ करा.   गॅस सिलेंडर जिथे ठेवला आहे तिथे जमिनीवर खुणा राहतात. त्यामुळे सिलेंडर ठेवण्याआधी त्याजागी मेण वितळवून टाकून ठेवा. मेणावर सिलेंडर ठेवल्याने कोणत्याही खुणा राहत नाहीत.

तयार केलेला स्वयंपाक नकारात्मक वातावरणात झाला तर त्याचा प्रभावही नकारात्मक रूपातच होईल. यामुळेच स्वयंपाकघर महत्त्वाचे असते.