अॅसिडिटी कमी करण्यासाठी योगासने व आहार

Story: संतुलन मंत्रा | अंजली पाटील |
05th August 2022, 10:37 Hrs
अॅसिडिटी कमी करण्यासाठी योगासने व आहार

अॅसिडिटी - पचनक्रियेत जठराग्नीमुळे ज्यामुळे अन्नाचे विघटन होण्यास मदत होणे आणि पचनसंस्था चालते. असे हे पाचकरस बनवण्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा वाढले तर या अवस्थेला अॅसिडिटी झाली असे म्हणतात.

कारणे:

१) आहारात अति तिखट अन्नपदार्थांचा समावेश

२) मांसाहार, फास्टफुड खाणे

३) तणाव

४) काही औषधे उदा. पेन किलर

५) दारूचे सेवन करणे

आहारः

१) आंबट फळे जसे संत्री, मोसंबी, अननस, सफरचंद इ. खाणे टाळावे. जास्त आंबट फळामुळे अॅसिडिटी निर्माण होते. त्याऐवजी केळी, चिकू, टरबूज खाणे.

२) तेलकट, तूपकट पदार्थ खाणे टाळावे.

३) मांसाहार टाळावा.

४) रेडी टू इट पदार्थ टाळावे.

५) शिळे अन्न, ब्रेड, पिझ्झा, बर्गर खाणे टाळावे.

६) सिगरेट, दारू, अति प्रमाणात चहा कॉफी पिणे टाळावे.

७) थंड दूध, नारळपाणी, सरबत हे अॅसिडिटी कमी करण्यास मदत करतात.

८) नियमित व्यायाम करावा आणि जेवणानंतर शतपावली करावी.

९) जेवणात अल्कलाईन घटक असणारे पदार्थ खावेत. उदा. काकडी, केळी, पालक, कडधान्ये, बीट, गाजर, फ्लावर, कोबी, घोसावळ, दोडका इ.

अॅसिडिटीवर उपयुक्त योगासने

१) पादांगुष्ठासन २) पादहस्तासन ३) उत्तानासन ४) वीरभद्रासन ६) पश्चिमोत्तानासन ७) जानू शिरासन  ८) अर्ध मत्स्येंद्रासन ९) अर्ध नावासन १०) मयुरासन ११) शलभासन १२) भुजंगासन

१३) शीर्षासन  १४) वीरासन १५) शवासन

१६) सूर्यनमस्कार

१) पादांगुष्ठासन आसन कसे करावे?

१. दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. दोन्ही पाय जुळवून उभे राहा.

२. आता श्वास सोडत पुढे वाका व हात खाली नेत आपल्या पायांचे अंगठे त्या त्या हाताच्या अंगठ्यात व पुढील दोन बोटांत पकडा.

३. गुडघ्यात वाकू नका.

४. त्यानंतर श्वास सोडत आपले डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये घ्या. छाती मांड्यांना घट्ट चिकटलेली असावे.

२) पादहस्तासन

 वरीलप्रमाणेच करावे फक्त हाताचे पंजे पायाखाली सरकवून त्यावर उभे रहावे.

३) उत्तानासन 

पादहस्तासनाप्रमाणेच करावे फक्त यामध्ये हाताचे पंजे पायाच्या बाजूला जमिनीला टेकलेले असावेत.

४)उत्थित  त्रिकोणासन

१. दोन्ही हात शरीराजवळ ठेवून सरळ उभे राहा. पायाचे अंगठे व टाचा एकत्र ठेवा.

२. श्वास घेत डावा पाय डावीकडे घ्या. दोन्ही पायात तीन ते साडेतीन फुटांचे अंतर ठेवा. नंतर हात खाद्यांच्या रेषेत बाजूस जमिनीस समांतर अशा स्थितीत आणा, पंजे जमिनीकडे.

३. डावा हात वरच्या बाजूस जमिनीस काटकोनात ठेवा. उजवा हात खांदे व डावा हात एका रेषेत असावेत. डाव्या हाताचा पंजा उजव्या दिशेस असावा. आपली नजर वर डाव्या हाताच्या अंगठ्याकडे ठेवा.

५) वीरभद्रासन

१. प्रथम सरळ उभे राहा. आता दोन्ही हात बाजूने डोक्याच्या वर नेत दोन्ही पंजे एकमेकांना जुळवा.

२. डावा पाय अडीच ते तीन फुट बाजूस सरकवा. उजवीकडे धड वळवा व त्याच वेळी उजव्या पायाचे पाऊल ९० अंश उजव्या दिशेस बाहेर वळवा. आता डावा पाय किंचित उजव्या बाजूस वळवा.

३. उजव्या गुडघ्यात वाकत बैठक खाली घ्या. उजव्या गुडघ्यापाशी काटकोनात उजव्या पायाची मांडीखाली घ्या.

४. आता डावा पाय मागे ताणा व डावा गुडघा सरळ ठेवा.

६) पश्चिमोत्तानासन.. आपण पूर्वी माहिती दिली आहे.

७) जानू शिरासन

१. दोन्ही पाय पुढे घेऊन बसा

२. डावा पाय गुडघ्यात वाकवून पायाची टाच उजव्या जांघेजवळ चिकटून ठेवावी.

३. उजव्या बाजूस दोन्ही हात पुढे न्या. आधी उजव्या पायाची बोटे पकडा.

४. श्वास सोडून शरीर पुढे घेत जा.

८) अर्ध मत्स्येंद्रासन

१. जमिनीवर दोन्ही पाय सोडून बसा

२. बसताना असे व्यवस्थित बसा की, डाव्या पायाची टाच आपल्या पार्श्वभागाखाली येईल.

३. नंतर उजवा पाय गुडघ्यात वाकवून व जमिनीपासून उचलून डाव्या मांडीच्या बाहेरच्या बाजूस ठेवा.

४. आपले शरीर नव्वद अंशापर्यंत उजवीकडे वळवा व डावा दंड उजव्या गुडघ्याच्या बाहेरील बाजूस घ्या.

५. आपली मान उजवीकडे वळवा व नजर आपल्या पापण्यांपाशी रोखून धरा.

९) अर्ध नावासन - पूर्वी माहिती दिलेली आहे.

१०) मयूरासन ११) शलभासन १२) भुजंगासन १३) शीर्षासन

 इत्यादींची माहिती दिलेली आहे.