मत्स्यासन

'मत्स्य' म्हणजे 'मासा'. या आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये आपले शरीर माशाप्रमाणे दिसते म्हणून याला मत्स्यासन म्हणतात.

Story: संतुलन मंत्रा | अंजली पाटील |
11th June 2022, 12:47 am
मत्स्यासन

हे आसन करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी :

हे आसन नेहमीत रिकाम्या पोटी करावे.

शक्यतो हे आसन सकाळी करावे.

असं करण्यापूर्वी आपले शरीर शिथिल अवश्य करावे.

असं करताना आपले सर्व लक्ष एकाग्र चित्त करावे.

 हे आसन कोणी करू नये?

गर्भवती महिलांनी हे आसन करू नये.

पाठीचा कणा व पाठ दुखी ज्यांना आहे त्यांनी हे आसन करू नये.

हार्ट प्रॉब्लम ज्यांना आहे त्यांनी हे आसन करू नये.

हर्नियाची समस्या असणाऱ्यांनी हे आसन करू नये.

गुडघेदुखी ज्यांना आहे त्यांनी हे आसन करू नये.

मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी हे आसन करू नये.

 हे आसन कसे करावे?

सर्व प्रथम जमिनीवर योगा मॅट घाला व पाठीवर झोपा.

आता डावा पाय उजव्या मांडीवर व उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवा.

आता हळूहळू पाठीचा भाग वर उचला. शरीराचे वजन डोक्यावर व नितंबावर पडेल.

आता दोन्ही हातांनी दोन्ही पायांच्या पंज्यांचे अंगठे पकडा.

अंतिम स्थितीत सुरुवातीला ८ ते १० सेकंदच थांबा.

आसन सोडताना आधी अंगठे सोडून पाठ सरळ करा व मग पूर्वस्थितीत या.

या आसनात पायाचे अंगठे न पकडू शकल्यास ओढाताण न करता हाताचे पंजे जांघांवर ठेवावे.

आसन नेहमी आपल्या क्षमतेनुसारच करावे.  

श्वसन नॉर्मल असावे.

 या आसनाचे फायदे :

हे आसन नियमित केल्यास पाठीचा कणा, कंबर, पाठ आणि मांड्या यांचे स्नायू मजबूत होतात. 

हे आसन करताना मानेवर ताण पडतो त्यामुळे गळ्याच्या ग्रंथींना लाभ मिळतो.

थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते.

हे आसन केल्याने पचनक्रिया व मलावरोध सुरळीत होतो 

फुफ्फुसे व हृदय मजबूत होते. 

श्वासाशी संबंधित विकार बरे होतात.