आंब्याचे चवदार पदार्थ

Story: अन्नपूर्णा | प्रज्वलिता गाडगीळ |
11th June 2022, 12:37 Hrs
आंब्याचे चवदार पदार्थ

वाचकहो मी आपल्यासाठी घेऊन येतेय आंबा आणि त्याचे गुणधर्म. त्याचबरोबर रेसीपीही. आंबा हे असं फळ आहे ते सर्वांनाच फार आवडते. आंब्यामध्ये जीवनसत्व आणि खजिने परिपूर्ण आहेत. प्राचीन काळापासून  आंबा लेकप्रिय आहे. प्रत्येकांनी आंब्याला महत्त्व दिले आहे. तसेच अनेक लोकांनीही आंब्याच्या बागा तयार केल्या आहेत. त्यांना फार जपूनही ठेवल्या आहेत. उन्हाळ्यात तशी अनेक फळे येतात तरीही सर्वात आवडणारे फळ म्हणजेच आंबा. हा जेव्हा बाजारात येतो, तेव्हा सगळ्या फळांच डिमांड कमी होते. यावरूनच आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. तो एप्रिल ते मे असा थोडेच दिवस असतो. म्हणून आपण ​विविध प्रकार बनवतो आणि त्याची आठवण काढत वर्षभर खातो. आपण काय काय बनवतो असा प्रश्न आपल्या समोर पडला असे ना तर पन्हे, ज्युस, आईस्क्रीम वड्या,काप, साठं, आंबापोळी, शेक, लोणचं, जॅम, आमचूर, उकडआंबा, रोस चुंदा असे अनेक प्रकारांनी आंब्याचे प्रकार बनवून साठवून ठेवतो. 

आंब्याचा जॅम

साहित्यः आंबे ५, साखर अर्धा किलो, वेलची पूड. आंबे फारच गोड असतील तर अर्धा चमचा लिंबू रस, चिमुटभर मीठ. 

कृतीः आंबे चांगले धुवून घ्या. त्यानंतर ते सोला व व्यवस्थित त्याचा रस मिस्करमधून चांगला बारीक करून घ्या व गाळा. आता एक पातेल घ्या(टोप) त्यात साखर आणि आंब्याचा रस एकत्र करा आणि गॅसवर ठेवा. मंद गॅसवर ढवळत रहा. ते मिश्रण शिजताना अंगावर उसळत म्हणून पळी मोठी लांब सडक घ्या. चटके बसतात हं… हे मिश्रण जवळ आल्यावर लिंबाचा रस, मीठ टाका. वेलची पूड घाला व गॅस बंद करा. हा झाला जॅम. हा जॅम गार झाल्यावर बाटली चांगली कोरडी करून भरून ठेवा. चांगला वर्षभर टिकतो. जरी हा जॅम चांगला लागला तरी जपूनच खा. कारण पोळी, ब्रेड ह्यात लावून खाणे योग्य, त्यात साखर फार असते ना शिवाय उष्णही आहे. उगाचच आवडते म्हणून खाल्लं तर साखर वाढायची. आपण हा जॅम नक्की करा हं.

कुल्फी

आंब्याचा गर घ्या. त्यात मिल्कमेड घाला, दूध पावडर घाला. वेलची पूड, साय घाला व सर्व एकत्र करा खरंतर मिल्कमेड गोड आंबाही गोड असल्याने साखर थोड्या प्रमाणात घाला आ​णि हे मिश्रण चांगले ढवळा. कुल्फीच्या साच्यात घाला व फ्रीजमध्ये ठेवा.