ताजमहालाची आख्यायिका: एक ऐतिहासिक फसवणूक

मुगल सम्राट शहाजहान याने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेला ताजमहाल हा ऐतिहासिकदृष्टया प्रेमाचे प्रतीक मानले जाते, तथापि इतिहासकार श्री. पी. एन. ओक यांचे त्याबाबत वेगळे मत आहे व त्यांनी आपल्या "ताजमहल इज अ टेंपल पॅलेस" या पुस्तकात काही अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक वस्तुस्थिती उघड केली आहे ज्यामुळे ताजमहाल एक कबर आहे किंवा रजपूत राजवाडा अशी वाजवी शंका निर्माण होते.

Story: प्रासंगिक | अॅड. विनायक पोरोब |
21st May 2022, 09:16 Hrs
ताजमहालाची आख्यायिका:  एक ऐतिहासिक फसवणूक

उत्तर भारतातील आग्रा शहरात यमुना नदीच्या काठावर एक सुंदर भव्य इमारत आहे जी ताजमहाल म्हणून ओळखली जाते. इतिहास असे दर्शवितो की, आग्र्याच्या दक्षिण-पश्चिम दिशेला सुमारे ६०० मैल अंतरावर असलेल्या बुऱ्हाणपूर येथील एका हवेलीच्या बागेच्या मंडपात इ.स. १६३१ मध्ये मुमताजचा तिच्या अठरा वर्षांच्या वैवाहिक जीवनात चौदाव्या वेळी प्रसूत होताना मुत्यू झाला म्हणून तिला दफन करण्यात आले. सहा महिन्यानंतर मुमताजचा मृतदेह आग्रा येथे आणण्यात आला. शहाजहानने नवीन थडगे बांधले असते तर बारा ते तेरा वर्षांच्या कालावधीत मुमताजचा मृतदेह नवीन कबरीत संस्कारित करण्यासाठी आग्रा येथे नेण्यात आला असता, जो ताजमहालसारखी भव्य इमारत बांधण्यासाठी आवश्यक असलेला कालावधी आहे. आग्य्रातील जयपूर राजघराण्याचा राजवाडा योजनापूर्वक मुमताजच्या मृतदेहाच्या तातडीने पुनरूत्थानाच्या बहाण्याने, जप्त करण्यात आला होता. ही बाब काळानुसार स्पष्ट झाली आहे. राजा जयसिंग हा मुगलशाहीचा मांडलिक होता म्हणून त्याने ताजमहाल मुगलशाहीला बहाल केला.

फ्रेंच सराफ जीन बैप्टिस्टा तावेर्नियर, ज्याने इ.स. १६४९ ते १६६८ च्या दरम्याने भारतामध्ये व्यापारासाठी दौरा केला त्यावेळी त्याने आपल्या "ट्रॅव्हल्स इन इंडिया" या पुस्तकामध्ये नोंद केली होती की, त्याने या महान कार्याची सुरुवात आणि त्याची सिध्दता पाहिली होती. त्यांनी आपल्या विधानात म्हटले आहे की, मचानाची किमतच संपूर्ण कामाच्या किंमतीपेक्षा जास्त होती. शहाजहानने आज आपणास जसा दिसतो तसा ताजमहाल बांधला होता का? कारण हे हास्यास्पद ठरेल की जीन बैप्टिस्टा तावेर्नियरसारखा परदेशी पाहुणा असे म्हणतो की, मचानाची किंमत एकूण कामापेक्षा जास्त होती. जीन बैप्टिस्टा तावेर्नियर टिप्पणी करतो की, शहाजहानने कमानींचा आधार देण्यासाठी विटादेखील वापरल्या होत्या जे असे दर्शवितात की, कमानी आधीपासूनच अस्तित्वात होत्या जेव्हा मूळ दगडी छत शहाजहानने काढले होते व त्या ठिकाणी दुसरे छत बांधले होते, अशा पुनर्बांधणी करताना कमानींना विटांचा आधार घ्यावा लागला होता ज्यावरून हे सिध्द होते की, ताजमहाल त्याच्या कमानीदार प्रवेशव्दारासह मुमताजच्या मृत्यूपूर्वी देखील अस्तित्वात होता.

इ.स.वी. १६५२ मध्ये शहाजहानचा मुलगा असलेल्या शहजादा औरंगजेबने एक पत्र लिहिले होते जे तीन समकालीन पर्शियन बखरींमध्ये सापडले आहे. ज्यात त्याने सम्राट शहाजहानला अहवाल दिले की, इ.स. १६५२ मध्ये राज्यपाल म्हणून पदभार स्विकारण्यासाठी दिल्ली मार्गे दख्खनकडे जात असताना जेव्हा तो त्याच्या आईच्या म्हणजेच मुमताजच्या दफन स्थानास वंदन करण्यासाठी भेट देत असे त्यावेळी त्याच्या असे निदर्शनास आले की मयताच्या सन्मानार्थ उभारलेले स्मारक व थडगे चांगल्या स्थितीत व मजबूत असतात परंतु पावसाच्या ऋतूत उत्तरेकडील कबरीवरील घुमट दोन ते तीन ठिकाणी गळतो. ज्याची तात्पूरती डागडुजी केल्याचा तो दावा करतो. तो पुढे इ.स. १६५२ मध्येच ताजमहाल इमारत संकुल इतके प्राचीन झाले होते की त्याच्या विस्तृत दुरुस्तीची आवश्यकता होती, जरी मुमताजच्या निधनाची निश्चित तारीख नसली तरी ती इ.स. १६२९ ते १६३२ च्या दरम्याने ती मयत झाली असल्याचे समजते. ताजमहाल इमारत बावीस वर्षांच्या कालावधीत बांधण्यात आली या दाव्याचा विचार करता तो इ.स. १६५३ च्या आसपास बांधून पूर्ण झाले असेल. ताजमहाल पूर्ण होण्यापूर्वीच एका वर्षापूर्वी गंभीर दोष निदर्शनास आले होते ही बाब पूर्णपणे पटण्याजोगी नाही.

लाहोरच्या अझिजुद्दिनने मुद्रित केलेल्या आग्रा येथील ताजच्या मार्गदर्शिकेच्या पृष्ठ क्रमांक १४ वर असे आढळून आले आहे की, कामगारांवर पूर्ण जबरदस्ती केली होती आणि वीस हजार कामगारांना अल्प मोबदला रोख स्वरूपात दिला गेला होता. ताजमहालसारखी आणखी एखादी वास्तू बांधू नये म्हणून कुशल कारागिरांचे हात कलम करण्यात आले. इतिहासकार श्री. पी. एन. ओक यांच्यामते वरील दंतकथेचे केलेले विश्लेषण मुर्खपणाचे आहे त्याची कारणे पुढील प्रमाणे:

१) ताजमहालाची कल्पना करणे व बांधणे यासारख्या अत्यंत परिष्कृत सौंदर्याचा भाव असलेला एखादा राजा, त्याच्यासाठी कठोर परिश्रम घेतलेल्या हातांची काटछाट करण्याचा प्रयत्न करू शकतो का? 

२) एक असंतुष्ट सम्राट त्याच्या दुःखामध्ये इतका पाषाण हृदयाचा होईल का, की ज्यांनी त्याच्या प्रिय पत्नीसाठी थडगे बांधले त्यांना अपंग करेल? 

अर्थातच क्रूर विच्छेदनाला प्रेमाचे वळण देणे म्हणजेच निर्लज्ज चेह-यावर, शहाजहानच्या क्रूरतेवर आच्छादन घालण्याचा प्रयत्न आहे.

ताजमहाल ही एक सात मजली रचना असून त्यातले चार किंवा पाच संगमरवरी मजले आहेत व उर्वरित खालचे लाल दगडाचे आहेत जे नदीच्या मागील काठावरून पाहिले जाऊ शकतात. नदीकडे पोहोचण्यासाठी एखाद्यास पूर्व दरवाजाने बाहेर जावे लागेल आणि उत्तर दिशेला प्रवणाच्या बाजूने डावीकडे वळावे लागेल. हवा खेळती ठेवण्यासाठी असलेल्या खिडक्यांना आतून तटबंदी केली गेली आहे. डाव्या व उजवीकडील दोन मनो-यांच्या मधून संगमरवरी चौकोनी खांबांच्या तेहतीस कमानी समोर दिसतात. संगमरवरी व्यासपीठ चौरसाकृती असून रूंदीला देखील तेहतीस कमानी आहेत. अशाप्रकारे तळमजल्यावरील  संगमरवरी खांबांमध्येच ३३x३३ = १०८९ बंदिस्त खोल्या आहेत. बहुतांशी लोक ताजमहालातील मुमताजचे थडगे पाहून समाधानी असतात. ते नदीच्या मागील बाजूस जात नाहीत. नदीच्या बाजूने पाहता एखादयाच्या निदर्शनास येईल की, वरच्या मजल्यावरील चार मजली संगमरवरी रचना असून त्याच्या खाली लाल दगडात आणखी दोन मजले आहेत. चार संगमरवरी मजल्यांच्या व्यतिरिक्त पाचव्या मजल्यावरील लाल दगडी कमानी असून ज्यामध्ये २२ खोल्यांचा समावेश असून सहावा मजला खांबात आहे. खांबांच्या डाव्या कोप-यात एक प्रवेशव्दार दिसू शकते ज्यातून आतमधील दालनाची उपस्थिती निदर्शनास येते, जिथून आंघोळीसाठी नदीवर कोणीही येऊ शकते. सातवा मजला हा खांबाअंतर्गत जमिनीखाली असावा जसे प्रत्येक प्राचीन हवेलीचे खाली तळघर असते, तेथे सात मजल्यांना लागून सुंदर दालनासह एक भव्य अष्टकोनी विहीर आहे आणि शाही पाय-या बरोबर खाली पाण्याच्या पातळीवर उतरतात जसे एखादा ताजमहालाच्या संगमरवरी खांबाकडे तोंड करून लाल दगडाच्या फरसबंदीवर उभा आहे, त्याच्या डाव्या हाताच्या टोकाला लाल दगडी अष्टकोनी बरूज असून तेथे विहीरघर आहे. वेढा घातला जात असल्यास जर इमारत शत्रूला आत्मसमर्पित करावी लागली तर तिजोरीची पेटी इमारत परत ताब्यात घेतल्यावर वापस मिळावी म्हणून पाण्यात ढकलली जायची. त्यामुळे तिजोरीची पेटी विहिरीच्या खालच्या मजल्यामध्ये ठेवली जायची आणि लेखापाल, खजिनदार, रोखपाल वरच्या मजल्यावर बसायचे. जर ताजमहाल एक समाधी असती तर अशी अष्टकोनी बहुमजली विहीर आवश्यक नसती. ताजमहालाला सात मजले असून त्यापैकी सहा बंद आहेत. मध्यभागी संगमरवरी इमारत दोन सममितीय एक आणि अग्रभागी एक पूर्व आहे आणि पार्श्वभूमीत एक पश्चिमेकडे आहे. पश्चिमेच्या इमारतीजवळील डावीकडील लहान मनो-याने विशाल अष्टकोनी सातमजली विहीर बंदिस्त केली आहे. इतिहासकार श्री. पी. एन. ओक यांच्यानुसार संस्कृत शिलालेखातून ताजमहाल हा शहाजहानच्या आधी ५०० वर्षांपूर्वी राजा परमादीदेवाच्या कारकिर्दीत बांधलेला राजाचा राजवाडा आहे.

सर्व खोल्या व पाय-या ज्या बंद आहेत त्या उघडल्या पाहिजेत, जेणेकरून लोकांना ताजमहाल ही शेकडो खोल्या लपविणारी एक रचना आहे असे समजेल व भारताचे सुजाण नागरिक या नात्याने ते संपूर्ण ताजमहाल पाहण्याचा आग्रह धरतील व केवळ थडग्याच्या दालनाकडे डोकावून निघून जाणार नाहीत. भारतीय पर्यटन विभागाने इतिहासकार श्री. पी. एन. ओक यांनी त्यांच्या पुस्तकातील केलेल्या खुलाशांचा विचार करून आणि ताजमहालाच्या बंदिस्त खोल्यांमध्ये लपविलेले रहस्य उघड करण्यासाठी सर्व बंदिस्त खोल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार लोकांसाठी उघडल्या पाहिजेत. वास्तविक संशोधनासाठी तळाशी असलेले पुरावे उघड करण्यासाठी सात मजली अष्टकोनी विहीरीमधून पाणी बाहेर काढावे, अन्यथा शहाजहानची आख्यायिका किंवा ताजमहालाचे ऐतिहासिक सत्य नेहमीच एक रहस्य राहील.

(हा लेख एक इतिहासप्रेमी असल्याने आणि " ताजमहल इज अ टेंपल पॅलेस "या पुस्तकाचे लेखक श्री. पी. एन. ओक यांच्या ऐतिहासिक शोधांनी प्रेरित होऊन ऐतिहासिक दृष्टिकोनातून लिहिलेला आहे. या लेखाच्या लेखकाचा कोणत्याही व्यक्ती / व्यक्तींच्या, धर्म, जात अथवा समुदायाच्या धार्मिक भावना / संवेदनशीलता दुखाविण्याचा हेतू नाही. लेखक हा वकील असून तो म्हापसा-गोवा येथे वकिली व्यवसाय करतो.)